Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीकांत कासट यांच्या दुर्गवैभव महाराष्ट्राचे’चे प्रकाशन

संगमनेर/प्रतिनिधीः दुर्गमित्र श्रीकांत कासट यांनी गेल्या चार दशकांत महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर भटकंती करतांना तेथील इतिहास, त्याची माहिती व

ज्ञानशील कुटुंबासाठी प्रत्येक घरात छोटे पुस्तकालय असावे ः डॉ. बाबुराव उपाध्ये
बेट भागातील गटारी दुरुस्त करण्याची मागणी
Shrirampur : शेततळ्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू (Video)

संगमनेर/प्रतिनिधीः दुर्गमित्र श्रीकांत कासट यांनी गेल्या चार दशकांत महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर भटकंती करतांना तेथील इतिहास, त्याची माहिती व छायाचित्रांचे संकलन केले आहे. त्यांच्या या परिश्रमांना धुळ्यातील इतिहासाचार्य वि.का.राजवाडे प्रकाशनाने पुस्तकाचे रुप देतांना ‘दुर्गवैभव महाराष्ट्राचे’ हा सचित्र माहितीग्रंथ साकारला आहे. गीता परिवाराच्या वतीने संगमनेरात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, पानिपतकार, साहित्यिक विश्‍वास पाटील, गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, उद्योजक मनीष मालपाणी, केंद्रीय आरोग्य विभागाचे सहाय्यक सचिव डॉ.ओमप्रकाश शेटे, लेखक श्रीकांत कासट व राजवाडे संशोधन केंद्राचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना शेटे म्हणाले की, कोणत्या जातीत, मातीत, राज्यात, देशात अथवा खंडात जन्माला यायचे हे आपल्या हाती नसते. पण, महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येणार्‍या प्रत्येकाला शिवचरित्राशी जोडणारे असंख्य श्रीकांत कासट या मातीत जन्माला आले आहेत. वयाच्या पासष्टीत सह्याद्रीच्या कातळात धावणार्‍या श्रीकांत कासट यांच्यासारखा कडवट मराठा आपण आजवर बघितला नसल्याचेही डॉ.शेटे यांनी यावेळी बोलतांना सांगितले. डॉ.संजय मालपाणी यांनी प्रास्तविकात श्रीकांत कासट यांच्या अपरिचित असलेल्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. गीता परिवाराच्या माध्यमातून बालगोपाळांना गडकोटांचा लळा लागावा, छत्रपती शिवरायांचा पराक्रम त्यांना प्रत्यक्ष अनुभवता यावा. यासाठी राबविल्या गेलेल्या गिरीभ्रमण मोहीमेबाबतही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. दुर्गवैभव पुस्तकातील माहिती त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचा परिपाक असल्याने त्याचा आधार घेवून निर्धोकपणे गडवाटा तुडविता येतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. मनीष मालपाणी व डॉ.ओमप्रकाश शेटे यांनीही पुस्तकाचे महत्त्व विशद् करतांना कासट यांच्या समर्पित भावनेचे कौतुक केले. पुस्तकाचे लेखक श्रीकांत कासट यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संगमनेरातील व्याख्यानमालेतून आपण प्रभावित झाल्याचे सांगितले. प्रज्ञा म्हाळस व संजय करपे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

COMMENTS