Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकहिताचे कार्य गरजू पर्यंत पोचवणार- न्या. नितीन जीवने

त्र्यंबकेश्वर- त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माध्यमातून लोकहिताचे कार्य गरजूंपर्यंत पोहोचवू असे प्रतिपादन श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानचे चेअरमन न्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अहमदनगरचं नातं | Ambedkar Jayant Special | LokNews24
महान गायक आणि संगीतकार गोल्डमॅन बप्पी लाहिरी काळाच्या पडद्याआड | LokNews2
संसदेच्या हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून

त्र्यंबकेश्वर- त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माध्यमातून लोकहिताचे कार्य गरजूंपर्यंत पोहोचवू असे प्रतिपादन श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानचे चेअरमन न्याधिश नितीन जिवने यांनी येथे केले. श्री त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट सहकार्याने व या  मंदिराचे घटक तुंगार ट्रस्ट मंडळ यांच्या वतीने मंदिरात जमा होणाऱ्या  निर्माल्यापासून (देवाला वाहून जमवलेली फुले) बनवलेल्या अगरबत्तीचा लोकार्पण सोहळा आज सायंकाळी देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन न्यायमूर्ती जीवने बोलत होते. फुले सुंदर असतात एका सुंदरतेतून  दुसरी सुंदरता निर्माण झाली आहे .अशा प्रकारे त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट लोकहिताचे कार्य करेल असा विश्वास न्यायाधीशांनी दिला. या कार्यक्रमाला देवस्थानचे सर्व विश्वस्त तसेच नगरपालिकेच्या  मुख्याधिकारी श्रिया देवचके ,माजी नगराध्यक्ष तुंगार बंधू ,उपस्थित होते. प्रास्ताविक देवस्थानचे विश्वस्त दिलीप तुंगार यांनी केले. तर आभार प्रदीप तुंगार यांनी मानले. श्रीराम कुटे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला देवस्थानचे विश्वस्त, तुंगार ट्रस्ट मध्ये मधील प्रतिनिधी, देवस्थानचे अधिकारी उपस्थित होते. अल्प दरात सुगंधी उदबत्त्या भाविकांना मिळेल अशी ग्वाही देवाच्या दरबारात देण्यात आली आहे. सोमवती अमावस्या आणि जागतिक न्याय दिन असा योगायोग साधून कार्यक्रम झाला. मावळत्या विश्वस्त मंडळाच्या काळात सात कोटी रुपये खर्च करून  त्रंबकेश्वर मंदिराचे दर्शन बारी, पूर्व दरवाजा  विकास झाला. आता तुंगार ट्रस्टच्या पुढाकारांनी उदबत्तीचा सुगंध दरवळला.

COMMENTS