अशोक’ चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक’ चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न

अशोकनगर -  गेले ३५ वर्षे अनेक संकटावर मात करीत अशोक कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. सदरची वाटचाल अशीच अविरत चालू राहणार असून कारखान्याच्या दै

कायदा व सुव्यवस्थेचे पालन स्वतःपासून करावे
संपूर्ण महाराष्ट्र तिसऱ्या लेवलमध्ये , कोरोनासह डेल्टा प्लसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय LokNews24
कर्मवीर शिक्षणक्षेत्रातील जननायक ः प्राचार्य टी. ई. शेळके

अशोकनगर – 

गेले ३५ वर्षे अनेक संकटावर मात करीत अशोक कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. सदरची वाटचाल अशीच अविरत चालू राहणार असून कारखान्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेत ५ हजार टनापर्यंत वाढ तसेच आसवणी व इथेनाॕल प्रकल्पांच्या क्षमतेत प्रतिदिन ४० हजार लिटर्स वरुन एक लाख लिटर्स पर्यंत वाढविणेबाबतची अनुशंगिक कामे प्रगतीपथावर आहेत. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान असलेला इन्शुलेशन बॉयलरची उभारणी करुन कारखाना ‘झिरो प्रदुषण’वर नेण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी दिली.

अशोक सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे माजी चेअरमन के.वाय.बनकर यांचे अध्यक्षतेखाली तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी संचालक श्री.दत्तात्रय कुंडलीक नाईक व त्यांच्या पत्नी सौ.शांताताई नाईक आणि गोडावून किपर श्री.अनिल कोकणे व त्यांच्या पत्नी सौ.विद्याताई कोकणे या दांम्पत्याचे हस्ते विधीवत पूजन करण्यात आले.

      याप्रसंगी बोलताना श्री.मुरकुटे म्हणाले की, ३५ वर्षापूर्वी कार्यक्षेत्रात केवळ ३६ हजार मे.टन ऊस उपलब्ध होता. त्यावेळी अनेकांनी कारखाना बंद ठेवण्याची सूचना केली होती. अशाही स्थितीत कारखाना संचालक मंडळाने कारखाना चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. तो निर्णय कारखाना वाटचालीत ऐतिहासिक ठरला. त्यानंतर कारखान्याने केवळ साखर निर्मितीवरच न थांबता अल्कोहोल, इथेनॉल व वीज निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले . काळानुसार सुधारणा व मशिनरी बदल करुन कारखाना अद्ययावत केल्यानेच आज दैनंदिन ४२०० ते ४५०० मे.टन ऊस गाळप करणे शक्य होत आहे. यावर्षी कार्यक्षेत्रात सुमारे १० लाख टन ऊसाची उपलब्धता आहे. तर ऊस टंचाईच्या संकट काळात कार्यक्षेत्राबाहेरील शेतकरी सहकार्य करतात. त्यांचा जवळपास २ लाख टन असे एकूण १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट्य आहे. भविष्यात इथेनॉलचे महत्त्व ध्यानात घेऊन इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. सध्या केंद्र शासनाकडून पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाची परवानगी आहे. त्यात २० टक्के पर्यंत वाढ होणार आहे. तसेच कारखान्याच्या पंपावर उत्पादीत केलेले इथेनॉल मिश्रण करण्याचीही परवानगी दिली जाणार आहे. कंन्ट्रीलिकर उत्पादनाचा परवाना मिळविण्यासाठीही पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती श्री.मुरकुटे यांनी दिली.

    सध्या पाऊसपाणी चांगले असून भंडारदरा व निळवंडे धरणाचे मिळून १९ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. मात्र येत्या दोन वर्षात निळवंडे कालव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर निळवंडे धरणाच्या ८ टीएमसी पाण्यास आपल्याला मुकावे लागणार आहे. निळवंडेचे कालवे झाल्यानंतर केवळ भंडारदर्‍याचे ११ टीएमसी पाण्यावरच आपल्याला अवलंबून राहावे लागणार आहे. पिण्यासाठीचे २ टीएमसी व औद्योगिकरण इत्यादी वापरासाठी १ टीएमसी  वगळल्यास शेतीसाठी फक्त ८ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे शेतीसाठी केवळ २ किंवा ३ रोटेशन्स मिळतील. यात पुन्हा समन्यायी पाणी वाटप कायद्याचा मोठा अडसर असणार आहे. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल. अशास्थितीत आपण आमदारकीच्या काळात गोदावरी व प्रवरा नदीवर बांधलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, तसेच कार्यक्षेत्रात अशोक बंधारे प्रकल्प अंतर्गत निर्माण केलेल्या अशोक बंधार्‍यांचे जाळे हेच भविष्यात उपयुक्त ठरतील. आपण आजवर सभासदांच्या विश्वासाधीन राहून काम केलेले असल्याने कितीही राक्षसी प्रवृत्ती व अपशकुनी काळी मांजरे आडवी गेली तरी पुढचे संचालक मंडळ आपलेच असेल, असा ठाम विश्वास श्री.मुरकुटे यांनी यावेळी व्यक्त केला.

            यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.के.वाय.बनकर, माजी कामगार संचालक काशिनाथ गोराणे, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.सुनिता गायकवाड, भाऊसाहेब पारखे आदींनी मनोगत व्यक्त केले. कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब कहांडळ यांनी प्रास्तविक, तर संचालक श्री.अभिषेक खंडागळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी संचालक संतोष देवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

       याप्रसंगी व्हा.चेअरमन पोपटराव जाधव, ज्येष्ठ संचालक रावसाहेब थोरात, सुरेश गलांडे, सोपानराव राऊत, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या समन्वयक सौ.मंजुश्री मुरकुटे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, अशोक बँकेचे व्हा.चेअरमन अ‍ॅड्.सुभाष चौधरी, अशोक दूधचे चेअरमन श्रीधर कोलते, अ‍ॅड्.उमेश लटमाळे, माणिकराव शिंदे, राम पटारे, बाबासाहेब काळे, रोहन डावखर, अच्युतराव बनकर, आण्णासाहेब बनकर, भाऊसाहेब मुळे, माजी कार्यकारी संचालक सुरेश चव्हाण, निवृत्ती थोरात, बाळासाहेब दांगट, गोरक्षनाथ ताके, काकासाहेब शेजुळ, अ‍ॅड्.डी.आर.पटारे, भास्करराव बंगाळ, अ‍ॅड्.कचेश्वर बडाख, भागवतराव पटारे, अण्णासाहेब चौधरी, ठकसेन खंडागळे, दौलतराव बनकर, अंबादास आदिक, माणिकराव पवार, भागतवराव पवार, नितीन दांगट, दिगंबर शिंदे, बाळासाहेब कासार, सोपानराव नाईक, बाळासाहेब नाईक, पांडूरंग शिंदे, रामदास पटारे, महेश कुर्‍हे, रईस शेख, आशिष दोंड, नारायण बडाख, रविंद्र पवार, साहेबराव वाबळे, निवृत्ती बडाख, जालिंदर वाकचौरे, भाऊसाहेब बनसोडे, भाऊसाहेब पटारे, रामभाऊ कासार, कैलास शेजुळ, प्रविण फरगडे, निरज मुरकुटे, सौ.शालिनीताई कोलते, सौ.मिराताई पारधे बापूसाहेब गायकवाड, प्रफुल्ल पवार, भागवत भोंडगे आदींसह सभासद, हितचिंतक, कारखाना संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS