Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बरकत नगर येथील नागरिक समस्या संदर्भात नगरपरिषदेला निवेदन

लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे वाल्मीक अण्णा कराड यांचे आश्वासन

परळी वैजनाथ वार्ताहर - राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या बरकत नगर भागात अनेक नागरिक समस्या असून याकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत अ

पांढरी येथे पायाभूत सुविधांसाठी 3 कोटींचा निधी
छत्तीसगडमध्ये ट्रक आणि बोलोरा गाडीच्या भीषण अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू
नाशिक शहरातील स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या कामांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी

परळी वैजनाथ वार्ताहर – राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या बरकत नगर भागात अनेक नागरिक समस्या असून याकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील रहिवासी करीत आहे .
महत्त्वाचे म्हणजे बरकत नगर भागातील रज्जाक किराणा ते  उस्मानिया मस्जिद जाणार्‍या रोडवर ते जमजम भागात जाणार्‍या रोडवर एक ते दिड वर्षा  पूर्वी भुयारी गटारा अंतर्गत अंडरग्राउंड पाईपलाईनचे काम करण्यात आले खोदकाम करण्यात आलेले मातीमुळे त्या ठिकाणी चिखल झाल्यामुळे वाहतुकीस व येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे विशेष म्हणजे हे रोडवरून येतील नागरिक पाच टाईम नमाजला ये जा करीत आहे यामुळे सगळ्यात जास्त त्रास या नागरिकांना होत आहे व काही ठिकाणी चेंबर टाकण्यात आले हे चेंबर सुमारे अर्धा ते एक फुट वरी असल्यामुळे येथून ऑटो ला रोड वरून येता जाता येत नाही व नागरिकांना साधे पाही चालता येत  नाही याची दखल घेत राजू भाई यांच्या नेतृत्वाखाली राजू भाई मित्र मंडळ तर्फे नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले व तसेच नगर परिषद चे गटनेते वाल्मीक अण्णा कराड यांना भेटून नागरिक समस्या संदर्भात चर्चा केली व वाल्मीक अण्णा कराड यांनी तात्काळ याची दखल घेत लवकरच प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन राजू भैया मित्र मंड च्या शिष्टमंडळ ला देण्यात आले
————–लुक्याचे भुषण तालुक्याचे भूमिपुत्र अड. नरसिंह लक्ष्मणराव जाधव यांची औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठ बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पाटोदा येथे यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी सत्काराचे उत्तरात अड.नरसिंह जाधव यांनी आजच्या न्यायालयीन प्रक्रियेत आपण संविधानाच्या चौकटीत राहून गरीब जनतेस न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहुत लोकांच्या विविध विकासात्मक प्रश्न जनहित याचिकेद्वारा लढवून लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करूत सोबतच आपल्यावरील वडिलांचे संस्कारा मुळेच आपण या पदावर पोहोचू शकलो असे त्यांनी सांगितले.
पाटोदा विश्रामगृहावर रविवारी दि.16 सायंकाळी 5:00 वा. पत्रकार अब्दुल कादर मकरांनी,विजय जाधव, हमीदखान पठाण, सचिन पवार, जावेद शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते अड.ज्ञानेश्वर नाईकनवरे,अबलुक घुगे,मुबीन शेख,अड.सय्यद वहाब तसेच  आदींनी पाटोदा चे भूमिपुत्र अड. नरसिंह जाधव यांची औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पाटोदा सह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते व पत्रकारांनी यावेळी  अड.जाधव यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन मोठ्या आपुलकीने सत्कार केला. पाटोदा पत्रकारांच्या वतीने सुद्धा जाधव यांचा सत्कार करण्यात आले. सत्कारमूर्ती यांनी बोलताना सांगितले की  मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद यामध्ये तब्बल बारा जिल्हे मराठवाड्याचे आठ व पश्चिम महाराष्ट्राचे चार असे एकूण बारा जिल्ह्याचा न्यायदानाची काम  चालते या मध्ये अनेक ज्ञानी विधीतज्ञ असतात आणि अशा न्यायालयाच्या बार कौन्सिलच्या अध्यक्षीय पदासाठी आपली नियुक्ती ही आपल्या वडिलांच्या आपल्यावरील संस्कारामुळे पुण्याईमुळे झाल्याचे सांगून या नियुक्तीचा उपयोग मी तालुक्याच्या विविध प्रश्नाला न्यायालयीन द्वारा न्याय मिळवून देण्याचे काम करून दाखवेल. लोकशाही राज्यात राज्यघटनेच्या अधीन राहून न्यायदानाचे काम संविधानानुसार चालत असते सध्याची देशातील राजकीय परिस्थिती संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की अनेक लोक हे भ्रष्ट कारभार करून स्वतः उजळमत्याने वागतात ही देशाच्या दृष्टीने मोठी भयावह परिस्थिती असून सर्वांनी या उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एकजूट होऊन संघर्ष करण्याची त्यांनी आवाहन केले.यावेळी त्यांनी पाटोदा येथील विविध झालेल्या भ्रष्ट कारभारात न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत भविष्यात सुद्धा आपण लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहुत असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी लोकांच्या केलेल्या सत्काराच्या सन्मानार्थ सगळ्यांचे आभार मानले कार्यक्रमास जेष्ठ समाजसेवक दलित मित्र पेंटर एकबाल, गुलाबराव घुमरे, दीपक (दादा) घुमरे,माजी सरपंच जुबेर चाऊस,शेख मुबारकभाई,विष्णुपंत घोलप, सरपंच चंद्रकांत राख,इस्हाकसेठ सौदागर,बप्पासाहेब जाधव, शिवभूषण जाधव,कल्याणराव भोसले, दादाराव घुमरे, बिनवडेभाऊ, गणेश कवडे, संतोष तांबे, रामदास भाकरे,शेख नसीर, मंगेश पवारसर शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी औरंगाबाद खंडपीठाचे अड.विनायक सोळुंके, पेंटर एकबाल,सुरेखाताई खेडेकर, उमर चाऊस,सुरेंद्र तिपटे,  आदींनी आपले मनोगत व्यक्त करताना एडवोकेट जाधव यांच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अड.सय्यद वहाब यांनी केले.

COMMENTS