मुंबई : पात्र-अपात्र रहिवाशांचे धारावीतच पुनर्वसन करावे, धारावीकरांना 500चौ फुटाचे घर द्यावे आणि अदानी समूहाला हा प्रकल्प देऊ नये अशा अनेक मागण्य
मुंबई : पात्र-अपात्र रहिवाशांचे धारावीतच पुनर्वसन करावे, धारावीकरांना 500चौ फुटाचे घर द्यावे आणि अदानी समूहाला हा प्रकल्प देऊ नये अशा अनेक मागण्यांसाठी धारावीकर आंदोलनाच्या पवित्र्यात असून 1 मार्च रोजी धारावीत जाहीर सभा होणार आहे. अदानी समूहाकडून धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांना मुलुंड किंवा वडाळ्यात घरे दिली जाणार आहेत.
धारावीकरांची 500 चौ फुटाच्या घरांची मागणी असताना पात्र रहिवाशांना 350चौ फुटाचे घर दिले जाणार आहे. या सर्व गोष्टींना धारावीकरांचा विरोध आहे. सरसकट धारावीकरांचे, पात्र-अपात्र रहिवाशांचे धारावीतच पुनर्वसन करावे, धारावीकरांना 500चौ फुटाचे घर द्यावे आणि अदानी समूहाला हा प्रकल्प देऊ नये अशा अनेक मागण्या धारावीकरांच्या आहेत. मात्र या मागण्यांकडे कानाडोळा करत धारावी पुनर्विकास प्रकल्प पुढे नेला जात असल्याचा आरोप धारावीकरांकडून केला जाता आहे. या पार्श्वभूमीवर धारावीकरांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी, अदानी समूहाला असलेला आपला विरोध राज्य सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी 1 मार्चला जाहीर सभेचे आयोजन केले आहे. शेतकरी कामगार पक्षाकडून 1 मार्चला धारावीतील शीव-माहीम लिंक रोडवरील पर्ल रेसिडेंन्सीजवळ सायंकाळी 5 वाजता ही जाहीर सभा होणार आहे. धारावीकर धारावी सोडून इतरत्र कुठेही जाणार नाहीत. धारावीची बीकेसी होऊ देणार नाही असा निर्धार या सभेत केला जाणार आहे.
COMMENTS