Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता येथे जागतिक ग्राहक दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

राहाता : जागतिक ग्राहक दिनानिमित्त राहाता तहसील कार्यालय येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र (राहाता तालुका) व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (अहिल्यानगर) यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांना स्मरण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  कार्यक्रमाच्या प्रारंभी पुरवठा अधिकारी भारत खरात यांनी प्रास्ताविकात ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती दिली. १५ मार्च १९६२ रोजी जागतिक स्तरावर ग्राहक संरक्षणाचा पाया रचण्यात आला असून ग्राहकांना सुरक्षितता, वस्तू व सेवा निवडीचा हक्क, माहिती मिळविण्याचा हक्क, ऐकून घेण्याचा हक्क, ग्राहक शिक्षण व तक्रार नोंदविण्याचा हक्क असे मूलभूत अधिकार प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी तहसीलदार अमोल मोरे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, बाळासाहेब मुळे, पुरवठा निरीक्षक स्नेहल गायकवाड, कृषी विभागाचे टी. के. जाधव, महावितरणचे प्रतिनिधी पाटील, अनिकेत भालेराव यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  ग्राहक पंचायतचे अध्यक्ष रावसाहेब गाढवे यांनी ग्राहक हक्क, कर्तव्य व जागरूकतेविषयी मार्गदर्शन केले. ग्राहकांनी सजग राहून आपल्या हक्कांचे संरक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले. इंडियन गॅसचे संचालक उदय खर्डे यांनी गॅस वापरात सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करत गॅस पाईप दर पाच वर्षांनी बदलण्याची गरज स्पष्ट केली.  या कार्यक्रमात उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांसमोर ग्राहकांचे विविध प्रश्न मांडून त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. कार्यक्रमास ग्राहक पंचायतचे अध्यक्ष रावसाहेब गाढवे, सचिव वरुण वर्मा, संघटक प्रकाश बेंद्रे, सहसंघटक नंदकिशोर वर्मा, प्रवासी संघटक भालचंद्र लोंढे, शरद कुदळे, विलासराव औताडे, पत्रकार धनंजय वाकचौरे, सारंग वर्मा, बंधन मंटाला, विकास हेमके, अविनाश साळुंखे, अतीम चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, शासकीय कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सद्गुरू कृषी महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात 
जवळा गटातील शेतकऱ्यांचा वीजप्रश्न मार्गी लागणार; आजिनाथ हजारेंची सभापती प्रा.राम शिंदे यांच्याकडे मागणी
गटारीचे पाणी नदीपात्रात सोडणे बंद करा : ढाकणे

राहाता : जागतिक ग्राहक दिनानिमित्त राहाता तहसील कार्यालय येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र (राहाता तालुका) व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (अहिल्यानगर) यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांना स्मरण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी पुरवठा अधिकारी भारत खरात यांनी प्रास्ताविकात ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती दिली. १५ मार्च १९६२ रोजी जागतिक स्तरावर ग्राहक संरक्षणाचा पाया रचण्यात आला असून ग्राहकांना सुरक्षितता, वस्तू व सेवा निवडीचा हक्क, माहिती मिळविण्याचा हक्क, ऐकून घेण्याचा हक्क, ग्राहक शिक्षण व तक्रार नोंदविण्याचा हक्क असे मूलभूत अधिकार प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

 यावेळी तहसीलदार अमोल मोरे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, बाळासाहेब मुळे, पुरवठा निरीक्षक स्नेहल गायकवाड, कृषी विभागाचे टी. के. जाधव, महावितरणचे प्रतिनिधी पाटील, अनिकेत भालेराव यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 ग्राहक पंचायतचे अध्यक्ष रावसाहेब गाढवे यांनी ग्राहक हक्क, कर्तव्य व जागरूकतेविषयी मार्गदर्शन केले. ग्राहकांनी सजग राहून आपल्या हक्कांचे संरक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले. इंडियन गॅसचे संचालक उदय खर्डे यांनी गॅस वापरात सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करत गॅस पाईप दर पाच वर्षांनी बदलण्याची गरज स्पष्ट केली.

 या कार्यक्रमात उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांसमोर ग्राहकांचे विविध प्रश्न मांडून त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. कार्यक्रमास ग्राहक पंचायतचे अध्यक्ष रावसाहेब गाढवे, सचिव वरुण वर्मा, संघटक प्रकाश बेंद्रे, सहसंघटक नंदकिशोर वर्मा, प्रवासी संघटक भालचंद्र लोंढे, शरद कुदळे, विलासराव औताडे, पत्रकार धनंजय वाकचौरे, सारंग वर्मा, बंधन मंटाला, विकास हेमके, अविनाश साळुंखे, अतीम चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, शासकीय कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS