Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांची लूटमार करणार्‍या पं. स. अधिकारी, कर्मचार्‍यांरांना सुतासारखा सरळ करणार – अनिलदादा जगताप

बीड प्रतिनिधी - गोरगरीब शेतकरी हवालदिल झाला असताना पंचायत समितीची अधिकारी तथा कर्मचारी शेतकरी बांधवांची निरर्थक लूट करत असल्याच्या तक्रारी शेतकर

साहेब चषक संभाजीनगरच्या यंग बॉईजने पटकावला
Ajit Pawar : विजय स्तंभ परिसराचा विकास करण्याचा सरकारचा निर्णय | LOKNews24
अखेर संजय राऊत यांना अटक; पत्राचाळ घोटाळयात ईडीची कारवाई

बीड प्रतिनिधी – गोरगरीब शेतकरी हवालदिल झाला असताना पंचायत समितीची अधिकारी तथा कर्मचारी शेतकरी बांधवांची निरर्थक लूट करत असल्याच्या तक्रारी शेतकरी बांधवांनी शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांच्याकडे केल्या आहेत. बीड तालुका पंचायत समितीच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांची प्रचंड हाल होत आहेत. पंचायत समितीमधील जे अधिकारी, कर्मचारी शेतकर्‍यांची लूटमार करत आहेत त्यांना शिवसैनिकांचा दणका दाखवण्याची वेळ आली असून बोलून सांगून सुधरत नसतील अशा भ्रष्ट अधिकारी कर्मचार्‍यांना सुता सारखा सरळ करण्याची धमक शिवसैनिकांमध्ये आहे कदाचित याचा विसर भ्रष्ट अधिकारी कर्मचार्‍यांना पडला असावा म्हणून पंचायत समिती कार्यालयामध्ये शिवसैनिकांचा मोठा ताफा घेऊन लवकरच घुसणार आहे असे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी सांगितले आहे.
बीड तालुका पंचायत समितीमध्ये शेतकर्‍यांच्या सिंचन विहिरीसाठी दहा ते पंधरा हजार रुपये घेतले जातात. विहिर मंजूर झाल्यानंतर मस्टर काढण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये घेतात. फळबाग मस्टर काढण्यासाठी पैशाची मागणी केली जाते. घरकुल कामासाठी व इतर कामे करून देण्यासाठी पैशांची मागणी केली. सर्वसामान्य लोकांची कामे होत नाहीत. या सर्व बाबींचा जवाब विचारण्यासाठी शिवसेचे जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप आपल्या शिवसैनिकांसह लवकरच स्वतः पंचायत समितीमध्ये घुसणार असून अनिलदादा जगताप शेतकर्‍यांची लूटमार करणार्‍या सर्व अधिकारी व कर्मचारी यांची झाडाझडती घेणार आहेत.
शेतकर्‍यांच्या पाठीशी शिवसेनेची ताकद- अनिलदादा जगताप
पंचायत समितीमध्ये शेतकर्‍यांची लूटमार करणार्‍या अधिकार्‍यांनो वेळीच सरळ व्हा गोर गरीब शेतकरी बांधवांना एकटे समजू नका लक्षात ठेवा शेतकर्‍यांच्या पाठीशी शिवसेनेची ताकद उभी आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवावर झालेला अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. ज्या शेतकर्‍यांना विविध कामांसाठी अधिकारी व कर्मचारी पैसे मागतात आणि विनाकारण त्रास देत लूटमार करतात अशा सर्व लोकांना आपल्या मदतीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप 9673789789 , तालुकाप्रमुख गोरख सिंघन 9834887257 , शहरप्रमुख सुनिल सुरवसे ,9422858787  या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन बीड शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे.

COMMENTS