नरेंद्र फिराेदिया ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्काराने गौरवीत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नरेंद्र फिराेदिया ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्काराने गौरवीत

नगर ः  प्रतिनिधी परिवर्तन ही अतिशय सकारात्मक संकल्पना आहे. कठीण परिस्थितीत सर्व समाजघटकांना सकारात्मक बदलाची गरज भासते. अशा वेळी परिवर्तन घडवण्यास

अहमदनगर : शहरातील रस्त्यांचे खड्डे प्रकरण थेट कोर्टात
अहमदनगर शहरात स्वच्छतेचा बोजवारा… कचरा महापालिकेत आणून टाकण्याचा इशारा
सौरऊर्जा पथदिवे काळाची गरज : मा. नगरसेवक अजिंक्य बोरकर

नगर ः  प्रतिनिधी

परिवर्तन ही अतिशय सकारात्मक संकल्पना आहे. कठीण परिस्थितीत सर्व समाजघटकांना सकारात्मक बदलाची गरज भासते. अशा वेळी परिवर्तन घडवण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेऊन योगदान देणाऱ्या व्यक्तींचे कार्य महत्त्वाचे ठरते. अहमदनगरमध्ये सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय असणारे ‘आय लव्ह नगर’चे संस्थापक तथा उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी काेराेनाच्या कठिण काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून माेलाचे याेगदान दिले. याची दखल घेत ‘इंटरॅक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी’ या प्रतिष्ठित संस्थेतर्फे ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज २०२०’ या पुरस्काराने गाैरविण्यात आले.

समाजासाठी कल्याणकारी उपक्रम सातत्याने राबवून परिवर्तन घडवण्यात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक व्यक्तींना ‘इंटरॅक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी’ या प्रतिष्ठित संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले. अभिमानास्पद बाब म्हणजे, ‘आय लव्ह नगर’चे संस्थापक तथा उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते फिरोदिया यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. 

फिरोदिया यांनी ‘आय लव्ह नगर’ आणि स्व. शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवले. कोरोना काळात सर्वच क्षेत्रांतील तसेच समाजघटकांतील प्रत्येकाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. यातून मार्ग काढण्यासाठी परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने फिरोदिया यांनी प्रयत्न केले. परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करताना त्यांच्या योगदानाची दखल घेत ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज २०२०’ याअंतर्गत फिरोदिया यांना सन्मानित करण्यात आले. 

मुंबई येथे ‘इंटरॅक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी’ आणि ‘पंचायती टाइम्स’ यांच्यावतीने आयोजित समारंभात विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थी व्यक्तींना गौरविण्यात आले. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले तसेच सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, राज्य सरकारच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, अभिनेता जॅकी श्रॉफ, गायक उदित नारायण आदींचा समावेश आहे. न्यायमूर्ती के. जी. बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली समितीने परिवर्तन पूरक कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी पात्र व्यक्तींची निवड केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा कोरलेले पदक आणि विशेष प्रमाणपत्र देण्यात आले.

COMMENTS