Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकारांना शासकीय सवलतीसह पेन्शन द्या : प्रा. राळेभात  

जामखेड : काळानुरूप पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे. पत्रकारांना प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून अपडेट देण्यासाठी सतर्क राहावे लागते. सर्वच पत्रकारांन

रोटरी क्लब ऑफ जामखेडच्या सदस्यपदी प्रफुल सोळंकी
प्रा.डॉ.के.एच.शिंदे ‘रयत’च्या जनरल बॉडीवर
बुडनशहावली बाबांचा संदल उत्साहात

जामखेड : काळानुरूप पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे. पत्रकारांना प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून अपडेट देण्यासाठी सतर्क राहावे लागते. सर्वच पत्रकारांना उपजिवीकेचे पर्याय उपलब्ध नाहीत.  पत्रकार समाजाचा आरसा आहे. शासन, प्रशासन, समस्त समाजाचा दुआ आहे. मात्र हे काम करताना पत्रकारांच्या जीवनात अनेक समस्या आहेत. पत्रकारितेमधून कोणत्याही प्रकारची शाश्वत मिळकत नाही. हा कणा टिकून राहण्यासाठी सरकारने १०-२० वर्षे पत्रकारिता केलेल्या पत्रकारांना शासकीय सवलती व पेन्शन द्यायला पाहिजे असं मत प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले.

पत्रकार दिनानिमित्त जामखेड येथे विविध ठिकाणी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. आशा व्हेज ट्रिटच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा. मधुकर राळेभात बोलत होते. प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उद्योजक दिलीप गुगळे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, अमित चिंतामणी, ऍड.प्रविण सानप, केदार रसाळ, पवन राळेभात, पो.काँ.प्रकाश जाधव, पो.काँ. दत्तू बेलेकर होते.

यावेळी पत्रकार अशोक निमोणकर,नासिर पठाण, वसंत सानप, यासीन शेख, मिठूलाल नवलाखा,संजय वारभोग,ओंकार दळवी,समीर शेख, दत्तात्रेय राऊत, अविनाश बोधले, पप्पूभाई सय्यद, समीर शेख, सुदाम वराट, सचिन आटकरे, अशोक वीर, धनराज पवार, फारूख शेख, अजय अवसरे, सुजीत धनवे, विजय राजकर,प्रकाश खंडागळे, शंकर कुचेकर,अनिल धोत्रे, निलेश वनारसे,किरण रेडे,राजु भोगील, प्रफुल सोळंकी, शिवाजी इकडे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जामखेड नगरपरिषदच्या वतीने नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अमित चिंतामणी, भाजपाचे गटनेते तात्याराम पोकळे, नगरसेवक मोहन पवार, ॲड. प्रवीण सानप, पोपट राळेभात, प्रा.विकी घायतडक, हर्षद काळे,श्रीराम डोके, नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संभाजी कोकाटे, ज्ञानेश्वर मिसाळ, अमीर शेख, प्रमोद टेकाळे,रज्जाक शेख, महेश कवादे,अतुल कोकाटे,अतुल राळेभात, अनिल आरेकर, निवृत्ती चव्हाण आदी उपस्थित होते. नागेबाबा मल्टीटेट जामखेड शाखा, नगरसेवक मोहन उस्ताद पवार मित्र मंडळ यांच्या वतीनेही पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

COMMENTS