Homeताज्या बातम्यामनोरंजन

सिद्धार्थ-मिताली आईबाबा होणार

मराठी इंडस्ट्रीतील क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे टिनीपांडा म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर. दोघेही सोशल मीडियावर सक्

मोबाईलवर जोरात बोलल्याच्या रागातून एकाचा खून
मोटार वाईडींगचे दुकानातून 62 हजारांच्या साहित्याची चोरी
नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष अग्रवालांचा तडकाफडकी राजीनामा

मराठी इंडस्ट्रीतील क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे टिनीपांडा म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर. दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. मिताली आणि सिद्धार्थ नेहमीच रोमँटिक अंदाजात दिसत असतात. सिद्धार्थ आणि मिताली यांनी 2021 रोजी लग्न केलं. लग्नानंतर दोघेही सुखी संसार करताना दिसून आले आहेत. दरम्यान आता या दोघांच्या आयुष्यात तिसऱ्या माणसाची एंट्री होणार आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर आई-बाबा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिताली पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.मागील काही दिवसांपासून मिताली मयेकर सोशल मीडियावर कमालीची अँक्टिव्ह झाली आहे. मिताली आणि सिद्धार्थ सातत्यानं विदेश दौऱ्यावर असल्याचं पाहायला मिळालं आहे. काही महिन्यांआधीच दोघे पॅरिसला गेले होते. तिथलं कमाल फोटोशूट दोघेही शेअर करत होते. अशातच मितालीनं नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती हॉट पोझ देताना दिसत आहे. या पोस्टमधील तिचा हॉट अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडलाय. पण तिने या फोटोखाली दिलेल्या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधलं आहेमिताली मयेकर नेहमीच फोटोशूट शेअर करत असताना क्रिएटिव्ह कॅप्शन देताना दिसते. मितालीनं तिचा हॉट फोटो शेअर करत मॉमीस गेटींग हॉट असं कॅप्शन दिलं आहे.यावरून मिताली प्रेग्नंट असल्याचं दिसत आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत तू प्रेग्नंट आहेस का? असे प्रश्न विचारले आहेत. एका युझरनं लिहिलंय, “काय तू प्रेग्नंट आहेस का? हे खरं आहे का? वॉव”. सिद्धार्थ आणि मिताली यांनी 24 जानेवारी 2021मध्ये लग्न केलं. पुण्याच्या ढेपे वाड्यात अस्सल मराठमोळ्या पद्धतीनं दोघांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा रंगली. लग्नाआधी जवळपास 2 वर्ष लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होते. लग्नानंतर दोघांनी त्यांची स्वप्न पूर्ण केलीत. दोघे एकत्र दूर देशात फिरत असतातच. पण नुकतंच मुंबईमध्ये त्यांच्या हक्काचं घर देखील खरेदी केलं. घरातील महत्त्वाचे क्षण ते चाहत्यांबरोबर शेअर करत असतात

COMMENTS