Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजपा केंद्र सरकारचा निषेध मोर्चा

इस्लामपूर : कचेरी चौकात गॅस दरवाढीबरोबर पेट्रोल व डिझेल दर वाढीचा निषेध करताना महिला राष्ट्रवादी काँगेसच्या पदाधिकारी. इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळ

शिवंम प्रतिष्ठानतर्फे डॉ. सुरेश भोसले यांचा कोव्हीड योध्दा आरोग्य पुरस्काराने सन्मान
तडवळे येथील शिवकालीन ऐतिहासिक गडी नामशेष होण्याच्या मार्गावर
Yeola : येवला तालुक्यातील धुळगाव येथील भूमिपुत्राला अखेरचा सलाम (Video)

इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रति सिलेंडर 50 रुपये गॅस दर वाढ केल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय ते कचेरी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यंत निषेध मोर्चा काढून चौकात निषेध सभा घेतली. यावेळी महिलांनी भाजपा केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
सुनीता देशमाने म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील अच्छे दिनची स्वप्ने दाखवून सत्तेवर आले आहेत. 450 रुपयांचे गॅस सिलेंडर 950 रुपये करून आम्हा महिलांचे अर्थकारण बिघडविले आहे. तसेच त्यांनी पेट्रोल, डिझेल दरवाढ व महागाई वाढवित सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आम्ही महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनेक निषेध मोर्चे काढले. गेंड्याच्या कातडीच्या सरकारवर काही परिणाम होत नाही. मात्र, देशातील महिला त्यांना नक्की धडा शिकवतील.
महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा अलका माने म्हणाल्या, समाजात महिलांची निम्मी शक्ती आहे. तुम्ही आम्हाला कमकुवत समजू नका. तुम्ही आमचे अर्थकारण बिघडविले, आम्ही तुमचे राजकारण बिघडवू. यावेळी महिलांनी या सरकारचे करायचे काय? खाली डोके, वर पाय, गॅस दर वाढ कमी करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, मोदी सरकार हाय हाय आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका मेघा पाटील, तालुका उपाध्यक्षा सुजाता पाटील, उपाध्यक्षा वैशाली पाटील, तालुका सरचिटणीस जयश्री पवार, रंजना पाटील, सरिता पाटील, सरचिटणीस वैशाली निकम, सदस्या रेखा पवार, सदस्या संगीता पाटील, सदस्या वंदना हेरवाडे, सदस्या अश्‍विनी कोकाटे, भडकंबे अध्यक्षा भारती मोरे, जुनेखेड अध्यक्षा पद्मश्री पाटील, सदस्या नंदाताई पाटील, सदस्या ज्योती पाटील, सदस्या कल्पना पाटील, शोभा पाटील, स्मिता गायकवाड, भाग्यश्री पाटील, अनिता गुरव यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

COMMENTS