Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्यकर्ते आ. जयंत पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे

आ. आशुतोष काळे ः ईडी कारवाईचा राष्ट्रवादीकडून निषेध

कोपरगाव प्रतिनिधी :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतरावजी पाटील यांना ईडी कार्यालयाकडून नोटीस पाठवून त्यांची चौकशी करण्यात आली. केंद्रा

केंद्र शासनाने साखर निर्यातीचा निर्णय घ्यावा ः आमदार आशुतोष काळे
अपयशातून यशाचा मार्ग तयार करा ः आमदार आशुतोष काळे
नुकसानीचे पंचनामे करण्याच्या आ. काळेंच्या तहसीलदारांना सूचना

कोपरगाव प्रतिनिधी :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतरावजी पाटील यांना ईडी कार्यालयाकडून नोटीस पाठवून त्यांची चौकशी करण्यात आली. केंद्राच्या व राज्याच्या अखत्यारीत असलेल्या ईडी सारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव आणून विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष आ.जयंतरावजी पाटील यांच्यामागे खंबीरपणे उभे असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची आय. एल. अँड एफ. एस. अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस संबंधित कथित गैरव्यवहाराशी कोणताही संबंध नसतांना त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच ईडीकडून नोटीस पाठवून सोमवार त्यांची चौकशी करण्यात आली. त्या निषेधार्थ आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव येथे निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते. आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले, केंद्राच्या व राज्याच्या अखत्यारीत असलेल्या ईडी सारख्या संस्थांचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव आणून विरोधकांचा आवाज दाबण्याचा होत असेलेला प्रयत्न राजकीय प्रेरित आहे. प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांना चौकशीसाठी पाचारण करून त्यांची बदनामी केली जात आहे.यातून काहीही साध्य होणार नसून हा दबाव तंत्राचा वापर आहे. या घटनेचा जाहीर निषेध करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रभारी तहसीलदार विकास गंबरे यांच्या मार्फत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शहर युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, कारभारी आगवन, कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहम, डॉ. मच्छिंद्र बर्डे, गंगाधर औताडे, शंकरराव चव्हाण, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, संचालक राजेंद्र निकोले, रामदास केकाण, गौतम बँकेचे संचालक रायभान रोहम, प.स.माजी उपभापती अर्जुनराव काळे,माजी सदस्य मधुकर टेके, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पत संस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मुकुंद इंगळे, राजेंद्र आभाळे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, अजीज शेख, दिनकर खरे,राजेंद्र खिलारी, प्रशांत वाबळे, डॉ.आतिश काळे, तेजस साबळे, राजेंद्र जोशी, दीपक रोहम, अलीम शेख, नितीन शेलार, विशाल गुंजाळ, संतोष महाले, पांडुरंग कुदळे, ऋषिकेश खैरनार, गजानन मते, संतोष वर्पे, नानासाहेब चौधरी, ज्ञानेश्‍वर गव्हाणे, अनिल महाले शिवराम भारती,गणेश पारखे आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS