Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राध्यापक प्रतिभारत्न राष्ट्रीय पुरस्काराने प्रो. डॉ. सविता मेनकुदळे सन्मानीत

सातारा / प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील हिंदी विभागामध्ये कार्यरत असलेल्या प्रो. डॉ. सविता मेनकुदळे यांना म

देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; विकणार्‍यासह खरेदी करणारे सातारा जिल्ह्यातील तिघे अटकेत
विभुतवाडी येथील भीषण अपघातात सातार्‍यातील तिघांचा मृत्यू
राजभवनाच्या नावाने बँकेत खाते नसल्याने पैसे पक्षाला दिल्याचा न्यायालयात युक्तीवाद

सातारा / प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील हिंदी विभागामध्ये कार्यरत असलेल्या प्रो. डॉ. सविता मेनकुदळे यांना माईंड गॅलेक्सी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, शिरपूर, यवतमाळ यांच्या वतीने दिला जाणारा प्राध्यापक प्रतिभारत्न राष्ट्रीय पुरस्कार सन 2021- 22 समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर पूर्व, मुंबई या ठिकाणी आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात यशदा, पुणे येथील डॉ. बबन जोगदंड, प्रसिध्द सिने अभिनेत्री व फिल्म निर्मात्या हेमांगी राव. तसेच महाराष्ट्र फिल्म स्टेज अ‍ॅण्ड कल्चरल डेव्हलपमेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. कैलास पगारे यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तींना माईंड गॅलेक्सी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, यवतमाळ यांच्यावतीने दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे
प्रो. डॉ. सौ सविता मेनकुदळे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात हिंदी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आपले शिक्षण पूर्ण करणार्‍या डॉ. सौ. सविता मेनकुदळे यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी पदवी संपादन केली आहे. त्याचबरोबर हिंदी विषयातील अनेक विषयावर राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय शोध पत्रिकेतून शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. याशिवाय विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्या अनुदानातून एक संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे. त्याचबरोबर रुसा योजनेअंतर्गत एका संशोधन प्रकल्पाचा अभ्यास सुरू आहे. त्यांनी आपले उच्च शिक्षण पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संकल्पनेतील ’कमवा आणि शिका’ या योजनेतून पूर्ण केले आहे. सध्या त्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा या ठिकाणी हिंदी विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
या कार्यक्रमास माईंड गॅलेक्सी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जगदीश राठोड, डॉ. बी डब्ल्यू गायकवाड, डॉ. प्रदीप पंडित, प्रा. रेखा गायकवाड तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणारे अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रो. डॉ. सौ. सविता मेनकुदळे यांना मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, छत्रपती शिवाजी कॉलेजचे उपप्राचार्य प्रो. डॉ. अनिल वावरे, डॉ. रामराजे माने-देशमुख, डॉ. रोशनआरा शेख महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS