Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 सौ.के.एस.के.महाविद्यालयातील प्रा.मेघा माहूरे -मचाले यांंचा  सेवागौरव सोहळा संपन्न

बीड प्रतिनिधी - सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,बीड मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या प्रा

मणिपूर हिंसाचाराची होणार सर्वोच्च चौकशी
भररस्त्यात कॉन्स्टेबल आणि होमगार्डमध्ये सिनेस्टाईल हाणामारी
कोल्हापूरात मडकी खरेदीसाठी लोकांचा कल

बीड प्रतिनिधी – सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,बीड मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या प्रा.मेघा माहुरे-मचाले यांचा सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर साहेब व  उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या हस्ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांचा सपत्नीक सत्कार करून सेवा गौरव प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच सत्कारमुर्तीना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांनी प्राध्यापक मेघा माहुरे-मचाले यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रामाणिकपणा,शिस्त,स्वतःला झोकून देवून महाविद्यालयातील आपले कर्तव्य करीत राहिल्या असे आपले मत व्यक्त केले.सेवानिवृत्तीच्या काळानंतर आरोग्यदायी दीर्घआयुष्य व राहिलेल्या कला गुणांना वाव देऊन भविष्यकाळात चांगले जीवन जगावे असे शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयातील डॉ.माया खांदाट,डॉ.मंजू जाधव,डॉ.सुरेखा जोशी, प्रा.सत्येंद्र पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सन्मानपत्राचे वाचन डॉ.विनायक चौधरी यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी  नातेवाईक,आप्टेष्ट, मित्र,सहकारी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सेवानिवृत्त झालेल्या श्रीमती. मेघा माहुरे यांनी यावेळी आपण दिलेल्या सेवेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. सदरील कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर,उपप्राचार्य डॉ्र.शिवाजी शिंदे,पदव्युत्तर संचालक डॉ.सतीश माऊलगे,कमवि उपप्राचार्य डॉ.एन.आर.काकडे,पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर,कार्यालयीन अधिक्षक डॉ.विश्वांभर देशमाने तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सत्कार मुर्तीचे नातेवाईक,आप्टेष्ट, मित्र,सहकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दुष्यंता रामटेके तर आभार प्रदर्शन प्रा.ए.डी.खुटाळे यांनी मानले.

COMMENTS