exclusive stamp. exclusive round grunge sign. label मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या गैरकारभारासोबतच त्यांनी जमा
मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या गैरकारभारासोबतच त्यांनी जमा केलेली बेहिशोबी मालमत्ता तब्बल 200 कोटींच्या घरात असल्यामुळे त्यांची याप्रकरणी मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे सिद्धार्थ भराडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
बार्टीमध्ये सचिव सुमंत भांगे यांनी गोंधळ घातला असून, उत्कृष्ट आणि दर्जेदार प्रशिक्षण देणार्या अनुसूचित जातीच्या लोकांच्या संस्थांचे प्रशिक्षण कार्यक्रम बंद करून इतर अपात्र संस्थांना नियमबाह्य पद्धतीने रु. 25-25 लाखांची कामे दिली. याची केस उच्च न्यायालयात दाखल झत्तल्यास ती कामे रद्द करण्याची नामुष्की शासनावर आली. या बद्दलची तक्रार एका संस्था चालकाने पोलिस स्टेशनमध्ये देखील दाखल केला आहे. बार्टीच्या सगळ्या योजनेतून पैसे मिळवून देण्यासाठी हस्तक म्हणून कक्ष अधिकारी देशमुख व अवर सचिव अहिरे हे काम करत आहेत. यांची शासनाने उच्च पातळीवरुन चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भांगे यांना आता खाजगी सुरक्षारक्षकांच्या गराड्यात फिरावे लागते. मुंबई पोलिसांची तुलना इंटरपोलशी केली जाते, त्या मुंबई पोलिसांची तटबंदी मंत्रालयाला असताना भांगेंना खाजगी सुरक्षा रक्षक घेण्याची गरज का पडावी. त्यांच्या जीविताला असा कोणता धोका आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव म्हणून राज्याच्या ग्रामीण भागातून माणूस भेटण्यासाठी आला तर त्यांचे सुरक्षारक्षक भेटू देत नाहीत. जर एखाद्या वेळेस भेट घेऊन काही मागणी मांडल्यास त्यांना सुरक्षा रक्षकाद्वारे लगेच बाहेर हाकलले जाते. पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे ते सुरक्षा रक्षक गरीब माणसांच्या अंगावर धाऊन जातात. सरकार मधील लोकप्रिय मुख्यमंत्री, लोकप्रिय उपमुख्यमंत्री अनेक मंत्री तसेच राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव महसूल नितीन करीर, अपर मुख्य सचिव गृह लिमये, अपर मुख्य सचिव सेवा गद्रे तसेच नंदकुमार अपर मुख्य सचिव तसेच मंत्रालयातील सर्व प्रधान सचिव, सचिव तसेच राज्यातील अनेक महत्वपूर्ण पदावर आय.ए. एस. अधिकारी असून यांना एकाही खाजगी सुरक्षा रक्षकाची गरज पडत नाही व भांगेनांच 8-8 सुरक्षा रक्षक का लागतात?
या जिल्ह्यात आहे बेनामी संपत्ती ! सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना शेकडो कोटींची अवैध संपत्ती जमविल्यामुळे त्यांना कुख्यात गुंड दाऊदची भीती तर वाट नाही ना ? उपजिल्हाधिकारी म्हणून सेवेत आलेल्या भांगे यांनी आपल्या सेवेत म्हाडामध्ये 10 वर्ष, रायगड जिल्हाधिकारी आदी महत्वाच्या पोस्टिंग मिळवून 200 कोटींच्यावर संपत्ती जमविली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका आहे की काय याची चौकशी मुख्य सचिवांमार्फत करावी. भांगे यांचे मुंबई, नवी मुंबई, पुणे, लोणावळा, छत्रपती संभाजीनगर, लखनऊ, परभणी, हिंगोली, बीड आदी ठिकाणी अनेक फ़्लॅट व बंगले आहेत. त्यांचे नामी बेनामी शेकडो एकर जमीन आहे. उपजिल्हाधिकारी म्हणून सेवेत असलेल्या माणसाने एवढी प्रचंड माया कशी जमविली याची शासनाने उच्चस्तरीय कमेटी नेमून खास चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करण्यात आली.
COMMENTS