कोरोना काळात अभिवचन रजेवर गेलेला कैदी फरार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना काळात अभिवचन रजेवर गेलेला कैदी फरार

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्य शासनाच्या तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोना काळात 45 दिवसांच्या आपत्कालीन आकस्मित अभिवचन रजेवर मुक्त केलेला आरोपी त

गणेश कारखान्याची सर्वसाधारण सभा उत्साहात
संभाजी ब्रिगेडकडून रक्ताभिषेक आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध
विवेक कोल्हे यांच्याकडे स्व.कोल्हे साहेबांसारखे व्हिजन ः काका कोयटे

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्य शासनाच्या तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोना काळात 45 दिवसांच्या आपत्कालीन आकस्मित अभिवचन रजेवर मुक्त केलेला आरोपी त्यानंतरच्या काळात कारागृहात हजर न होता फरार झाल्याचे उघडकीस आले आहे. राजेंद्र बाबाजी भोर (रा. भोरवाडी, ता. नगर) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध विसापूर कारागृहातील पोलिस हेडकॉन्स्टेबल अब्दुल हमीद बर्फीवाले यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. 28) सायंकाळी फिर्याद दिली आहे. आरोपी राजेंद्र भोर हा विसापूर कारागृहात शिक्षा भोगत होता. कोरोना काळात शासनाच्या आदेशानुसार त्याला दि. 19 मे 2020 रोजी 45 दिवसांच्या आपत्कालीन आकस्मित अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्याला वेळोवेळी 30 दिवसांची रजा वाढवून देण्यात आली. नंतर तो दि. 18 जून 2022 रोजी कारागृहात हजर होणे आवश्यक होते, परंतु तो हजर झालेला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध फिर्याद देण्यात आली असून या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी राजेंद्र भोरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS