Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुझलॉन कंपनीचे टॉवरची कॉपर वायर चोरणारा एक अटक, दोन पसार.     

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर/प्रतिनिधी पारनेर तालुक्यातील शहाजपुर शिवारातील सुझलॉन कंपनीच्या टॉवर वरील 71 हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरून नेणाऱ्या चोरट्यास स्था

औताडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पोहेगावात नागरी सत्कार
श्रीगोंद्यात सात जणांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
कुसडगाव जलजीव योजनेचा चुकीचा सर्वे रद्द करा

अहमदनगर/प्रतिनिधी पारनेर तालुक्यातील शहाजपुर शिवारातील सुझलॉन कंपनीच्या टॉवर वरील 71 हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरून नेणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने पकडले.त्याच्या कडून 75 हजार रुपये किमतीची चोरीची कॉपर  वायर जप्त केली.ही कारवाई  नारायण गव्हाण शिवारातील  चौधरी ढाब्याजवळ केली.

या बाबतची माहिती अशी की, संतोष भिका लंके ( वय 45, रा. हंगा, ता. पारनेर ) हे नोकरीस असलेल्या सूझलॉन कंपनीचे शहाजापूर शिवारातील टॉवरची 71हजार रुपये किंमतीची कॉपर वायर अनोळखी चोरट्याने चोरुन नेली होती. या घटनेबाबत सुपा पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.ही घटना घडल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना चोरीचे गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.त्या आदेशा प्रमाणे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना देवुन तात्काळ रवाना केले. पोलिस पथक पारनेर, सुपा परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेताना त्यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा श्रीकांत जाधव याने त्याचे साथीदारासह केला असुन चोरी केलेली कॉपर वायर घेवुन नारायण गव्हाण शिवारातील चौधरी ढाब्या जवळ उभा आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस  पथकाने लागलीच त्या ठिकाणी जावुन खात्री करता एक संशयीत इसम गोणी घेवुन उभा असलेला दिसला. पथकाने संशयीतास ताब्यात घेवुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव श्रीकांत नामदेव जाधव, ( वय 28, रा. पळवे बुा, ता. पारनेर ) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली गोणीमध्ये जळालेली कॉपर वायर मिळुन आली. या कॉपर वायर बाबत विचारपुस करता त्याने शहाजापुर शिवारातील सुझलॉन कंपनीचे टॉवरची कॉपर वायर त्याचे साथीदार सुनिल जाधव व बाबु तराळ, ( दोन्ही रा. शहाजापुर, ता. पारनेर ) अशांनी मिळुन चोरी केली असुन ती विक्री करण्यासाठी जात आहे असे सांगितल्याने. त्यास 35 हजार रुपये किंमतीची 50 किलो कॉपर वायरसह ताब्यात घेवुन सुपा पोलिस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास सुपा पोलिस करीत आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे,पोलीस उप अधीक्षक, संपत भोसले यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

COMMENTS