Homeताज्या बातम्यादेश

राजधानीत प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांची भेट

नवी दिल्ली : संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व प्रफुल्ल पटेल राजधानी नवी दिल्लीत आहेत. अधिवेशनादरम्या

शरद पवारांना धमकी देणारा अटकेत
पंतप्रधान एका पक्षाचे नसून देशाचे असतात
पवारांनीच महाराष्ट्रातील घरं फोडली  

नवी दिल्ली : संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व प्रफुल्ल पटेल राजधानी नवी दिल्लीत आहेत. अधिवेशनादरम्यान पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली.  या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची आज राज्यसभेत कॅफेटेरिया येथे भेट झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या. या सर्व नेत्यांनी नवीन राज्यसभा सभागृहात एकत्रित फोटो काढला असून हा फोटो प्रफुल्ल पटेल यांनी शेअर केला आहे. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, नवीन संसद भवनातील ऊर्जा दिवस! राज्यसभेचं चेंबर हे एक चमत्कार आहे. हा क्षण आदरणीय शरद पवार साहेबांसोबत शेअर केल्याने तो आणखीनच खास बनला. कॅफेटेरियामध्ये मित्रांसह काही स्नॅक्स आणि सौहार्दाचा आस्वाद घेतला. खरोखरच लक्षात राहावा असा आजचा दिवस, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.

COMMENTS