Homeताज्या बातम्यादेश

पीओकेमध्ये पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार

नवी दिल्ली ः जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीवर केंद्र सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा स

स्वामीराज कुलथे यांना राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार घोषित
पुण्यात जनावरांचे मृतदेह विद्युत दाहिनीत करणार दहन
समझनेवालेको इशारा काफी है !

नवी दिल्ली ः जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीवर केंद्र सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्याची तयारी भारताने सुरु केली आहे. पाकिस्तानने घुसखोरीची वृत्ती थांबवली नाही तर, भारत सरकारसमोर कारवाईचे सर्व पर्याय खुले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सीमेत घुसखोरी पाकिस्तानी लष्कराच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही. कारण ही सर्व क्षेत्रे त्यांच्याद्वारे चालविली जातात आणि नियंत्रित केली जातात. सूत्रांनी सांगितलं की, अतिप्रशिक्षित दहशतवादी, जे घात लावून हल्ले करण्यात निपुण आहेत, त्यांना पाकिस्तानी लष्कराच्या सपोर्ट फायरने भारतीय सीमेत पाठवले जाते. सैन्याकडे तात्काळ प्रभावाने युद्धविराम संपवण्याचा पर्याय आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था खूपच खराब परिस्तिथीत आहे. यातच नियंत्रण रेषेच्या देखभालीसाठी त्यांच्या सरकारला मोठा खर्च करावा लागत आहे. जो त्यांना आता भारी पडत आहे.

COMMENTS