Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरेंमध्ये असंतोषाचा जनक होण्याची क्षमता

प्रकाश महाजनांनी मांडली मनसेची भूमिका

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांत राज्यात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे जनता अस्वस्थ आहे. राज्यातील जनतेला हे आवडलेले न

मिल्लीया महाविद्यालयात अंगदान जागृती कार्यक्रम संपन्न
 माझ्या यशात समता परिवाराचे महत्त्वपूर्ण योगदान ः अक्षय आव्हाड
वसंत रांधवण यांना निर्भिड पत्रकार पुरस्कार जाहीर

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांत राज्यात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे जनता अस्वस्थ आहे. राज्यातील जनतेला हे आवडलेले नाही. या असंतोषाचा जनक होण्याची क्षमता फक्त राज ठाकरेंमध्ये आहे. मात्र, हे फक्त उद्धव ठाकरे यांनी समजून घेतले पाहिजे. राज ठाकरे यांना नेतृत्व देऊन उद्धव ठाकरेंनी त्यांना आशीर्वाद दिले पाहिजेत, अशी भूमिका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मांडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करून चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दोन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांनी तर काही ठिकाणी पोस्टर्स लावून दोन्ही बंधूंना एकत्र यावे, असे आवाहन केले होते. अशात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याने महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे, अशी भूमिका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मांडली. तसेच, दोन्ही बंधू कधीही एकमेकांशी संवाद साधू शकतात, असे सूचक वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. यासंदर्भात बोलतांना प्रकाश महाजन म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादीत नेतृत्वावरून वाद झाल्याने हे पक्ष फुटले. त्यावर भाष्य करताना प्रकाश महाजन म्हणाले, नेतृत्व कोण करणार या किरकोळ गोष्टी आहेत. सध्या राज ठाकरे यांच्यासारखा लोकप्रिय, कार्यक्षम नेता मिळणे अवघड आहे. त्यामुळेच भाजप नेते राज ठाकरेंसोबत वैयक्तिक मैत्री ठेवतात. पण, याच भाजपला राजकीय सोय म्हणून भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालतो. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे हिंदूत्वाबद्दल काय विचार आहेत? तरीही भाजपला आता राष्ट्रवादी चालते. पण, याच भाजपला राज ठाकरे मात्र चालत नाहीत. भाजपचा हा दुटप्पीपणा आम्ही उघड करू.

COMMENTS