Homeताज्या बातम्यादेश

तब्बल तीन दशकांनंतर पुन्हा एकदा जगप्रसिद्ध मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात होणार

नवी दिल्ली प्रतिनिधी - 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा ही काश्मीरमध्ये होणार आहे. 140 देशांमधील स्पर्धक यावेळी या स्पर्धेक सहभागी होणार आहेत. मंगळवा

विद्युत ठेकदार 51 हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडला
राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी |
शेतजमिनीचे वाद मिटवण्यासाठी सलोखा योजनेचा लाभ घ्यावा – क्षीरसागर

नवी दिल्ली प्रतिनिधी – 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा ही काश्मीरमध्ये होणार आहे. 140 देशांमधील स्पर्धक यावेळी या स्पर्धेक सहभागी होणार आहेत. मंगळवारी 29 ऑगस्ट श्रीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या पत्रकार परिषदेमध्ये मिस वर्ल्ड 2023 या स्पर्धेबाबत चर्चा करण्यात आली. या पत्रकार परिषदेत मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलाव्स्की, मिस इंडिया सिनी शेट्टी, मिस वर्ल्ड कॅरिबियनएमी पेना आणि मिस वर्ल्ड इंग्लंड जेसिका गगेन आणि मिस वर्ल्ड अमेरिका श्री सैनी आणि मिस एशिया प्रिसिलिया कार्ला सपुत्री युलेस या उपस्थित होत्या. “काश्मीर हे मिस वर्ल्डसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे सर्व काही आहे. भारतातील हे सुंदर ठिकाण आणि येथील सुंदर तलाव मी पाहिले. सर्वांनी आमचे छान स्वागत केले. येथे आम्हाला मिळालेला पाहुणचार अप्रतिम होता. या स्पर्धेत 140 देश सहभागी होताना पाहणे हे रोमांचकारी ठरेल. प्रत्येक ठिकाणाचे स्वतःचे सौंदर्य असते. परंतु येथील सुखद आदरातिथ्य जबरदस्त आहे.’ असं कॅरोलिना बिलाव्स्कीनं पत्रकार परिषदेत सांगितलं. मिस इंडिया सिनी शेट्टी पत्रकार परिषदेत म्हणाली, “मिस वर्ल्ड 2023 काश्मीरमध्ये होणार आहे हा अभिमानाचा क्षण आहे. हा क्षण दिवाळी सणासारखा असेल कारण 140 देश भारतात येत आहेत आणि एक कुटुंब म्हणून स्पर्धेत सहभागी होत आहेत.” रुबल नागी आर्ट फाऊंडेशनचे रुबल नागी आणि भारतातील पीएमई एंटरटेनमेंटचे अध्यक्ष जमील सैदी हे देखील या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.मिस वर्ल्ड अमेरिका, श्री सैनी आणि ज्युलिया मोर्ले, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या चेअरपर्सन आणि सीईओ हे काश्मीर दौऱ्यात सामील झाल्या आहेत. जवळपास तीन दशकांनंतर मिस वर्ल्ड स्पर्धे या स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी भारताकडे देण्यात आली आहे. 1996 मध्ये भारतामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाची मिस वर्ल्ड स्पर्धा ही सामाजिक कार्यांना उत्तेजन देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ऐश्वर्या राय- बच्चन, प्रियंका चोप्रा, युक्ता मुखी या भारताच्या लेकींनी आतापर्यंत या सन्मावर आपले नाव कोरले आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2023 मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. स्त्रियांच्या सौंदर्य व बुद्धीचा गौरव करणे हा मिस वर्ल्ड या किताबाचा मुख्य उद्दिष्ट असतो.

COMMENTS