रूलिंग कास्ट म्हणून बाद झालेल्यांची नवी धडपड !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

रूलिंग कास्ट म्हणून बाद झालेल्यांची नवी धडपड !

काँग्रेस पक्षात प्रशांत किशोर यांचा प्रवेश निश्चित होत असतानाच अनेक कलमी प्रेझेंटेशन त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या समोर सादर करण्याचा सपाटा लावला. त्याचव

शाळांमधून होणार खिचडी हद्दपार
बेस्टच्या ’चलो कार्डा’चा तुटवडा; बस प्रवाशांची गैरसोय
कुष्ठधाम सोसायटीत फराळाचे साहित्य वाटप

काँग्रेस पक्षात प्रशांत किशोर यांचा प्रवेश निश्चित होत असतानाच अनेक कलमी प्रेझेंटेशन त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या समोर सादर करण्याचा सपाटा लावला. त्याचवेळी गुजरात मधून हार्दिक पटेल या युवा नेतृत्वाने गुजरात काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या हायकमांड विषयी हार्दिक पटेल यांची कोणतीही तक्रार नसली तरी गुजरातच्या नेतृत्वाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. एवढेच नाही, तर काँग्रेसचे नेतृत्व आपल्याला काम करू देत नसल्याचाही त्यांनी थेट आरोप केला आहे. हार्दिक पटेल यांचा उदय ज्या पद्धतीने गुजरातमधून झाला, त्यातून ते थेट आरएसएस चे प्रॉडक्ट आहेत असेच स्पष्टपणे दिसून आले होते. त्यांनी पाटीदार समाजाचे नेतृत्व सांभाळत असतानाच आरक्षण ‘आम्हाला नाही तर कुणालाच नाही’, ही घोषणा देऊन  पाटीदार समाजाचे जनांदोलन गुजरातमधून उभे केले होते. उत्तर भारतात एकाच वेळी जाट, गुजर आणि पाटीदार समाज यांचे तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे आरक्षण विरोधी आंदोलन किंवा स्वतःच्या जातीला आरक्षण घेण्याचे आंदोलन ही उपजच आरएसएसच्या मुशीतून निर्माण झाल्याचे स्पष्ट होते. मात्र त्याच वेळी हार्दिक पटेल हा चेहरा थेट गुजरातच्या भाजपचा चेहरा न करता पर्यायी पक्षाच्या धोरणाचा भाग म्हणून हार्दिक पटेल चे नेतृत्व काँग्रेसकडे वर्ग करण्यात आले. ते आज गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असतानाही त्यांनी पक्षाच्या राज्य नेतृत्वाविरोधात उघडपणे घेतलेली भूमिका ही पक्षांतर करण्याची भूमिका आहे का, याविषयी प्रश्न उभे केले जात आहेत. परंतु खरे पाहिले तर प्रशांत किशोर यांच्यासारख्या ऑफिस रणनिती कार असणारे व्यक्तिमत्त्व काँग्रेसमध्ये प्रभावी होऊ शकते की युवा लढाऊ नेतृत्व प्रभाव पाडू शकते, या संघर्षातून हार्दिक पटेल सारख्या नेतृत्वाची तगमग होताना दिसते आहे. आणि म्हणून प्रशांत किशोर च्या काँग्रेसमध्ये उभ्या राहणाऱ्या महत्त्वाच्या वेळीच हार्दिक पटेल यांची काँग्रेसवर टीका करणारी भूमिका येत आहे. कॉंग्रेससारख्या पक्षाकडे भारतभर जनता असल्यामुळे त्यांच्याकडे माणसं खूप असली तरी त्यांना काम करू देण्याची संधी मात्र कमी असते कारण पक्षावर पकड ठेवणारे लोक हे त्याच्या राज्यातील सत्ताधारी जात वर्गाची असतात परंतु अलीकडच्या काळात प्रत्येक राज्यात एकेकाळी रुलिंग कास्ट असणाऱ्या जातींचे महत्त्व राजकारणात कमी होतांना दिसत असल्यामुळे आणि याचे मुख्य कारण म्हणजे ओबीसी हा समाज राजकीय दृष्ट्या प्रत्येक राज्यात मोठ्या प्रमाणात जागृत झाल्यामुळे त्या त्या राज्यातील रुलिंग कास्ट असणाऱ्या परंपरागत जाती, म्हणजे उत्तर भारतात जाट, गुजर, गुजरातेत पाटीदार आणि महाराष्ट्रात मराठा या जातींना आता रुलिंग कास्ट या आपल्या नेहमीच्या ओळखीच्या बाहेर व्हावे लागले आहे, ही सध्याची वस्तुस्थिती आहे. आज आपण जर देशभरातील चित्र पाहिली तर प्रत्येक राज्यात एकेकाळी सत्ताधारी जात म्हणून ज्या एका जातीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते ते वर्चस्व आज पूर्णतः लयास गेलेले दिसते. त्यामुळे उत्तर प्रदेशसारख्या राज्यात कधीतरी जात हा समुदाय सत्तास्थानी होता राजस्थानसारख्या राज्यांमध्ये गुजर ही जात सत्तास्थानी होती तर गुजरात मध्ये पाटीदार ही जात सत्तास्थानी होती आणि महाराष्ट्रात मराठा हे सत्तास्थानी होते. आज या चारही जाती त्या – त्या राज्यांमध्ये रुलिंग कास्ट म्हणून राहिलेल्या नाही. उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्रीपद आता ठाकूर जातीकडे आहे, तर राजस्थानचे मुख्यमंत्री पद तिथल्या माळी जातीकडे आहे आणि गुजरातचे मुख्यमंत्री पद हे अल्पसंख्यांक समुहाच्या व्यक्तीकडे आहे आणि महाराष्ट्रात तर आता मराठा मुख्यमंत्री सलग आठ वर्षांपासून नाही. देशाच्या राजकारणात निर्माण झालेली ही अपरिहार्य राजकीय परिस्थिती पाहता आणखी येणाऱ्या काळात राजकीय सत्ता ही परिवर्तनाच्या दिशेने देशभरात बदल घडवून आणणारी ठरणार आहे, त्यामुळे या प्रयोगात आपले स्थान निश्चित करून घेण्याच्या दृष्टीने पटेल यांची हलचल सुरू झाली आहे. एका वाक्यात सांगायचे तर खुंटा हलवून मजबूत करण्याचे ते तंत्र आहे !

COMMENTS