Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधान परिषद सदस्य नियुक्तीला 7 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती .

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी 7 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे 7 फेब्रु

मोफत रोगनिदान शिबिरात 280 रुग्णांची तपासणी
अबला महिला की पुरूष?
वीजबील कमी करण्यासाठी टिप्स

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी 7 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे 7 फेब्रुवारीपर्यंत आमदार नियुक्तीचा कोणताही निर्णय घेता येणार नाही. मागील 2 वर्षांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती रखडली आहे. यापूर्वीच्या सरकारने आमदारांची एक यादी राज्यपालांकडे पाठवली होती. मात्र यावर राज्यपालांनी निर्णय घेतला नव्हता. त्यातच सरकार बदलले आणि नव्याने आमदारांची यादी पाठविण्यात आली. यावरून आता कायदेशीर पेच तयार झाला आहे.


याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीबाबत याचिकाकर्ते सुनील मोदी म्हणाले की, आज सुनावणीत मुळ याचिकाकर्त्यांनी विड्रॉलचा अर्ज दिला होता. तर माझा इंटर्वेशन अर्ज असल्यामुळे युक्तीवाद झाला. युक्तीवादात सरकारच्या वतीने तुषार मेहता आणि याचिकाकर्ते दवे तर आमच्याकडून नायडू युक्तीवादासाठी उभे राहिले. त्यावर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारले की, तुम्ही पीआएल केली आहे. मग विड्रॉल का करता, तसेच आता विड्रालॅ करता येणार नाही. तर माझे इंट्रव्हेशन मान्य झालं असून 7 फेब्रुवारीपर्यंत आमदार नियुक्तीबाबत स्थगिती देण्यात आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली आमदारांची यादी सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपालांकडून परत मागवली होती. त्यावर इंटर्व्हेंशन याचिका दाखल करण्यात आली होती. ही घटनाबाह्य कृती आहे. राज्यपालांनी घटनेमध्ये राहून काम केले पाहिजे. मात्र राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली. त्यामुळे आम्हाला स्थगिती मिळाल्याचे सुनील मोदी यांनी म्हटले.दरम्यान कोर्टाने सांगितले की, राज्यपालपद हे घटनात्मक पद आहे. राज्यपालांनी घटनात्मक पेच निर्माण होईल, अशी कृती करणे योग्य नाही, असंही न्यायालयाने नमूद केल्याचे याचिकाकर्ते सुनील मोदी यांनी सांगितले.

COMMENTS