Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपुरमध्ये आयकरच्या 9 कर्मचार्‍यांना सीबीआयकडून अटक

बोगस भरती प्रकरणी केली नागपूर शाखेने कारवाई

नागपूर : स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेत बोगस उमेदवार बसवून इन्कम टॅक्स विभागात भरती झालेल्या 9 जणांना सीबीआयच्या नागपूर शाखेने अटक केलीय. या सर्व कर

वाकडीत एक हजार विद्यार्थांना बुट आणि सॉक्सचे वाटप
धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर अत्याचार
मुख्यमंत्री 6 महिने घराबाहेरच निघाले नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला | LOKNews24

नागपूर : स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेत बोगस उमेदवार बसवून इन्कम टॅक्स विभागात भरती झालेल्या 9 जणांना सीबीआयच्या नागपूर शाखेने अटक केलीय. या सर्व कर्मचार्‍यांवर गुन्हेगारी षडयंत्र, बोगस कागदपत्र बनवणे आणि फसवणुकीच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यातआला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सीबीआयने याप्रकरणाचा भंडाफोड केला आहे..


सीबीआयने अटक केलेल्या आरोपींमध्ये स्टेनोग्राफर रिंकी यादव, अनिल कुमार, राहुल कुमार, अभय कुमार, मुकेश कुमार, चंदन कुमार, मनोज कुमार, प्रदीप कुमार आणि मनीष कुमार यांचा समावेश आहे. या सर्वांना नागपूरच्या आयकर विभागाने विविध जबाबदार्‍या दिल्या होत्या. सीबीआयला मार्च 2018 मध्ये एक तक्रार मिळाली होती. यात 2012 ते 2014 दरम्यान कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेला काही लोकांनी बोगस उमेदवारांना बसवून परीक्षा उत्तीर्ण करीत आयकर विभागात नोकरी मिळविल्याचा आरोप लावण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयला 12 कर्मचार्‍यांची नावे मिळाली होती. सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला. कर्मचारी निवड आयोगाला सर्व 12 उमेदवारांचे पेपर मागण्यात आले. संशयित उमेदवारांची सही, हस्तलिखित आणि बोटाचे ठसे घेण्यात आले. फॉरेंसिक चाचणीत 12 पैकी 9 कर्मचार्‍यांच्या जागेवर परीक्षा देण्यासाठी बोगस उमेदवार बसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सीबीआयचे नागपुरातील डीआयजी सलीम खान यांच्या मार्गदर्शनात प्रकरणाचा तपास करणारे डीवायएसपी संदीप चोगले आणि त्यांच्या पथकाने सर्व 9 आरोपींना अटक केली. त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांची 16 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

COMMENTS