Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पूजा खेडकरला तूर्त कठोर कारवाई नको : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलासा दिला आहे. तूर्त कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे

गोधेगावात किसनगिरी बाबांच्या जन्मसोहळयास भाविकांची मांदियाळी
आदिनाथ ढाकणे यांची नदी प्रहरी म्हणून निवड
शेतकर्‍यांसाठी शरद पवारांनी काय केलं ?  

नवी दिल्ली : माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलासा दिला आहे. तूर्त कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले. तसेच पूजा खेडकरला 14 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यात आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला आव्हान देणार्‍या खेडकर यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोग यांना नोटीस बजावली आहे.
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तोपर्यंत तिच्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

COMMENTS