Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूर पालिकेत भुयारी गटार मुद्यावरून राष्ट्रवादी-विकास आघाडीत राजकिय युध्द

इस्लामपूर / प्रतिनिधी : आगामी नगरपालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन विकास आघाडी व राष्ट्रवादी यांची पालिका राजकारणात संघर्षाची सुरुवात झाली आहे. याची

सैन्य भरतीसाठी घेतलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ; युवकाचे अपहरण
बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभाग तात्पुरता जागा
मनीष आणि सतीशकडून मनसुख हिरेन यांची हत्या, NIA चा दावा l पहा LokNews24

इस्लामपूर / प्रतिनिधी : आगामी नगरपालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन विकास आघाडी व राष्ट्रवादी यांची पालिका राजकारणात संघर्षाची सुरुवात झाली आहे. याची प्रचिती दोन दिवसांपूर्वी झालेल्या पालिका सभेतून लोकांना पाहायला मिळाली आहे. येणार्‍या पालिका निवडणुकीत या राजकीय युध्दाला तीव्र स्वरूप येण्याची शक्यता पालिका वर्तुळात वर्तवली जात आहे.
येत्या 23 डिसेंबरला विकास आघाडीचा सत्ता मुदत संपणार आहे. यामुळे राष्ट्रवादी व विकास आघाडीत राजकीय कुरघोड्या करण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी विकास आघाडी व राष्ट्रवादी यांची धडपड सुरू आहे. बंद असलेली भुयारी गटार योजना मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी बरोबर राष्ट्रवादीच्या नगरसेवक प्रयत्न करत आहेत. चार महिन्यांपूर्वी पालिका सभेत भुयारी गटार सुरू करण्याचा ठराव झाला होता. मात्र, त्यांची अंमलबजावणी पालिका प्रशासनाने केली नाही. यामुळे विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रमभाऊ पाटील व उपाध्यक्ष वैभव पवार, शिवसेनेचे शकिल सय्यद, प्रदीप लोहार, महाडीक गटाचे अमित ओसवाल, चेतन शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. कोण्या एका मोठ्या राष्ट्रवादी नेत्याच्या दबावाखाली भुयारी गटार कामास वेळ लावत असल्याचा आरोप करीत आत्मदहन व पालिका इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा दिला होता. यामुळे पालिका परिसरात तसेच शहरात खळबळ उडाली होती.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी मंजूर करून आणलेले 11 कोटीच्या निधीला नगरविकास खात्याने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती देण्यामागे राष्ट्रवादीचा हात असल्याचे शिवसैनिक सांगत आहेत. पालिकेतील या आरोपांच्या फैरी तसेच मुख्याधिकारी यांचा निषेध नोंदवत विकास आघाडीने इस्लामपूर शहर एक दिवस बंद ठेवले केले.
पालिकेत विकास आघाडीचे 13 व राष्ट्रवादीचे 14 व 1 अपक्ष नगरसेवक आहेत. मात्र, नगराध्यक्ष पद हे विकास आघाडीचे आहे. यामुळे गेल्या साडेचार वर्षात पालिका सभांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला आहे. आगामी पालिका निवडणूक जवळ येऊ लागल्याने हा संघर्ष जास्त उफाळू लागला आहे. आतापासून पालिकेच्या राजकारणासाठी संघर्षाची सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS