Homeताज्या बातम्यासंपादकीय

इराणीं’चे अज्ञान की असंवेदनशीलता ? 

 आकाशात घिरट्या घेत एका शहरातून दुसऱ्या शहरात उड्डाण करित एका सप्ततारांकित हाॅटेल मध्ये जमलेल्या श्रीमंत महिलांसमोर " जागतिक भूक अहवाला'वर टिका क

काॅंग्रेस पुन्हा जेष्ठांकडेच ! 
मराठेतर मुख्यमंत्री आणि आरक्षणाची टायमिंग! 
ओबीसींच्या प्रभावी काळातही……! 

 आकाशात घिरट्या घेत एका शहरातून दुसऱ्या शहरात उड्डाण करित एका सप्ततारांकित हाॅटेल मध्ये जमलेल्या श्रीमंत महिलांसमोर ” जागतिक भूक अहवाला’वर टिका करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या अज्ञानाविषयी लाज वाटावी की असंवेदनशीललतेविषयी, अशी थेट प्रतिक्रिया सुप्रिया श्रीनाते यांनी व्यक्त केली. त्याचवेळी खासदार कनिमोळी यांनी देखील इराणी यांनी हंगर इंडेक्सवर केलेल्या टिकेवर झोड उठवली आहे. हैद्राबाद येथील एक हाॅटेलमध्ये महिलांच्या एका कार्यक्रमात बोलताना स्मृती इराणी यांनी जागतिक हंगर इंडेक्स ने जानेवारी २०२३ मध्ये जाहीर केलेला अहवालात भारतात भुकेल्यांची संख्या अधिक असल्याचे नमूद केले आहे. एवढेच नव्हे तर, पाकिस्तान आणि बांगलादेश देश यांच्या पेक्षाही भारत मागे पडला आहे. नेमकी हीच गोष्ट इराणी यांना मंजूर नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्या म्हटल्या की, भारत हा भुकेल्यांचा देश कसा म्हणता येईल? मी सकाळी ४ वाजता घरून निघाले, ५ वाजेच्या विमानाने कोचीला गेले. तिथून विमानाने हैद्राबाद आले; या दरम्यान मी काही खाल्ले नाही, म्हणजे मी उपाशी आहे, असा याचा अर्थ होतो. स्मृती इराणी यांनी श्रीमंत वर्गाच्या महिलांसमोर ही मांडणी केल्यामुळे त्यावर हशा पिकला. म्हणजे त्याठिकाणी केवळ मंत्री असणाऱ्या इराणी याच केवळ असंवेदनशील नव्हत्या तर तेथे जमलेला तो श्रीमंत वर्गच असंवेदनशील होता. वास्तविक, जागतिक हंगर इंडेक्स ने अतिशय शास्त्रीय पध्दतीने हा अहवाल तयार केला आहे. अर्थात, कोणताही जागतिक अहवाल तयार करण्याचे काही आंतरराष्ट्रीय निकष असतात. ते अगदी तंतोतंत पाळावे लागतात. त्यासाठी जागतिक संस्था असणारी युनो देखील सतर्क असते. कारण,  अशा गंभीर अहवालात जराही खोटेपणा असला तर एखादा देश बदनाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे, असे अहवाल ज्या गांभीर्याने तयार केले जातात, त्याची माहिती अल्पशिक्षणामुळे इराणी यांना नसावी. वास्तविक, जागतिक हंगर इंडेक्स हा संबंधित देशातील पाच वर्षांखालील बालकांचे वय, वजन, उंची, त्यांचा शारिरीक विकास, त्यांचा मृत्यू दर अशा अतिशय गंभीर निकषांवरून ठरविण्यात येते. यासाठी संबंधित देशातील प्रत्यक्ष सर्व्हे केला जातो. त्या सगळ्या डेटाचे विश्लेषण केले जाते. त्यातील निष्कर्ष वारंवार तपासले जातात. एखाद्या देशाला आकडेवारी चे स्थान देताना त्याचे काय गंभीर परिणाम होतील याची अहवाल कर्त्यांना कल्पना असते, त्यामुळे अशा अहवालात शब्द न् शब्द अतिशय काळजीपूर्वक आणि तितक्याच गांभीर्याने वापरला जातो. असा गंभीर अहवाल इराणी या विनोदात निकाली काढण्याचा प्रयत्न करित असतील तर त्यांना या देशांच्या बालकांच्या जीवनाशी खेळ करायचा आहे, असा याचा अर्थ होतो. आपल्या देशाची भावी पिढी इतक्या गंभीर अवस्थेत असताना निवडणूकीच्या तोंडावर त्या अहवालावर टीका करणे म्हणजे मतदान मिळविण्यासाठी भारतीय बालकांचे प्राण देऊन का असेना, पण मतदान मात्र आम्हालाच द्या, असा निर्ढावलापणा आहे. इरणी यांच्या या वक्तव्यावर देशातील महिला राजकीय नेत्यांनी तुफान झोड उठवली आहे. त्यातूनच इरणी यांच्या असंवेदनशीलता आणि अज्ञान यापैकी कोणत्या गोष्टी विषयी आपण देशाच्या नागरिक म्हणून लज्जा बाळगावी याचा निर्णय मला करता येत नसल्याची प्रतिक्रिया काॅंग्रेस च्या महिला प्रवक्त्याने करणे, ही बाब गंभीरपणे विचारात घेण्याची आहे. जागतिक हंगर इंडेक्स ने समोर आणलेल्या वास्तवावर उपाय योजना करण्याचे सोडून त्यावर टिका टिप्पणी करणे म्हणजे ” रोम जळत असताना निरो फ्युडेल वाजवत होता,” असाच प्रकार म्हणायला हवा!

COMMENTS