Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. साईबाबांसह पाच जणांची निर्दोष मुक्तता

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल

नागपूर ः नक्षलवाद्यांशी असलेल्या कथित संबंधांच्या आरोपाखाली अटकेची कारवाई झालेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांच्यासह इत

लवादाने ठोठावलेल्या दंडाप्रकरणी बीसीसीआयला उच्च न्यायालयाकडून दिलासा
प्रसिद्ध कॉमेडी शो फ्रेंड्सचे अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन
29 ऑक्टोबर रोजी वधू-वर मेळाव्यास नाव नोंदणी करून उपस्थित रहा-तानाजी बाप्पू जंजिरे

नागपूर ः नक्षलवाद्यांशी असलेल्या कथित संबंधांच्या आरोपाखाली अटकेची कारवाई झालेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांच्यासह इतर पाच जणांची मंगळवारी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्या. वाल्मिकी एस. ए. मेनेजेस यांच्या खंडपीठाने साईबाबांसह इतरांना दोषी ठरवणारा नागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात यासंदर्भातील सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. अखेर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबा व त्यांच्यासह इतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
न्यायमूर्ती विनय जोशी व न्यायमूर्ती वाल्मिकी एस. ए. मेनेझेस यांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली होती. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. साईबाबा व इतर पाच जणांवर सत्र न्यायालयाने 2017 साली दोषनिश्‍चिती केली होती. त्याविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयासमोर सविस्तर सुनावणी पार पडल्यानंतर न्यायालयाने यासंदर्भातला निकाल दिला आहे. दरम्यान, राज्य सरकारने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत साईबाबा व इतर पाच जणांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, साईबाबा यांची 14 ऑक्टोबर 2022 रोजी उच्च न्यायालयातील याआधीच्या घटनापीठाने निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाचा हा निकाल रद्द ठरवत उच्च न्यायालयात नव्याने या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, सप्टेंबर 2023 मध्ये या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. तो निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. मार्च 2017 मध्ये गडचिरोलीतील सत्र न्यायालयाने साईबाबा व इतर आरोपांना नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याच्या व त्यातून देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांमध्ये दोषी ठरवले होते. साईबाबा व इतर दोन आरोपांकडे भूमीगत नक्षलवाद्यांना वितरीत करण्यासाठीचे साहित्य सापडल्याचे न्यायालयाने मान्य केले. तसेच, यातून लोकांना हिंसक कारवायांसाठी भडकवण्याचा हेतू असल्याची बाबही सत्र न्यायालयाने मान्य केली होती. साईबाबा यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती रोहित देव यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. 14 ऑक्टोबर 2022 रोजी न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटकाही केली. मात्र, महाराष्ट्र सरकारने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्द ठरवत पुन्हा सुनावणीचे आदेश दिले. त्यानंत आता दुसर्‍यांदा जी. एन. साईबाबा निर्दोष असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

COMMENTS