https://www.youtube.com/watch?v=E28A_7ZWMdM&t=3s अहिल्या नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील दीपक मोहन लुक्कड यांनी हर्ष बस सर
अहिल्या नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील दीपक मोहन लुक्कड यांनी हर्ष बस सर्विस या ट्रॅव्हल कंपनी बरोबर 15 मे 20 26 रोजी चारधाम तीर्थयात्रा करण्यासाठी करार करून स्लीपर कोच वातानुकूलित देण्याचे ठरल्यानुसार हरिद्वार पर्यंत त्यांनी बस दिली , दहा दिवसांनी तुम्हाला पुन्हा पुढील प्रवासासाठी बस मिळेल असे सांगून हरिद्वार मध्ये भाविकांना उतरून दिल्यानंतर तेरा दिवस उलटून गेले तरीही बस दिली नसल्याने नगर जिल्ह्याचे खासदार यांना प्रवाशांनी दुरध्वनी वरून संपर्क करून ट्रॅव्हल कंपनीची संवाद साधून दिल्याने त्यांनी पुढील प्रवासासाठी साधी नादुरुस्त अशी बस दिली मात्र बस नादृस्त असल्याने पुढील तीर्थयात्रा स्थगित करून प्रवाशांची पर्यायाने कंपनीने विश्वासघात करून फसवणूक केल्याने तीर्थयात्रा चालक व भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला , बस चालकाने यात्रेकरूंना बोधेगाव येथे सुखरूप आणून सोडले मात्र कंपनीने नादृस्त बस दिल्यामुळे बसला खर्च झाल्याने व त्याचा त्रास झाल्याने हर्ष बस सर्विस या ट्रॅव्हल कंपनीने तीर्थ यात्रा करणाऱ्या भाविकांना फसविल्याने बोधेगाव येथील पोलीस दूरक्षेत्रापुढे बस आणून शेवगाव पोलिसात फिर्याद दाखल करून तीर्थयात्रा अर्धवट व नादृस्त बससाठी झालेल्या खर्चाची मागणी लुवकड यांने केली आहे.

COMMENTS