गैरहजर राहणार्‍या व उशीरा येणार्‍या शिक्षकांवर कारवाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गैरहजर राहणार्‍या व उशीरा येणार्‍या शिक्षकांवर कारवाई

प्रशासक लांगोरे यांनी दिले आदेश

अहमदनगर/प्रतिनिधी : वाढत्या उन्हामुळे सकाळी सुरू केलेल्या शाळेस उशिरा येणारे शिक्षक वा गैरहजर राहणारे शिक्षक आता कारवाईच्या बडग्याखाली येणार आहेत. जि

इंडियाविरुद्ध एनडीएचा सामना रंगणार
अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी पठाण अमरजान यांची निवड
कर्जतमधील अपघातात तिघांचा मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी : वाढत्या उन्हामुळे सकाळी सुरू केलेल्या शाळेस उशिरा येणारे शिक्षक वा गैरहजर राहणारे शिक्षक आता कारवाईच्या बडग्याखाली येणार आहेत. जिल्हा परिषदेचे प्रशासक संभाजी लांगोरे यांनी भल्या सकाळी शाळांना भेटी देणे सुरू केले आहे. त्यांनी काही शाळांना भेटी दिल्या व शिक्षण विभागाच्या पथकानेही जिल्हाभरात अशा भेटी देऊन पाहणी केली. या पहिल्याच दिवशी सुमारे साडेचारशेवर शाळांना भेटी दिल्यावर काही शाळांतून आढळलेल्या शैक्षणिक त्रुटी तसेच उशिरा येणारे आणि गैरहजर राहणारे शिक्षक यामुळे होणार्‍या अडचणी पाहून त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत.
शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार सोमवारपासून (दि.5) जिल्ह्यातील शाळांची वेळ ही सकाळी 7 वाजताची करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी प्रशासक लांगोरे, शिक्षणाधिकारी संभाजी पाटील यांच्यासह जिल्हाभर गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी एकाच वेळी सकाळच्या सत्रात भरणार्‍या शाळांना भेटी दिल्या. लांगारे आणि पाटील यांनी सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी नगर तालुक्यातील नेप्ती गावाजवळील होळकर वस्ती शाळेला भेट दिली. त्यावेळी संबंधित शाळाच बंद होती. त्यानंतर नेप्ती गावातील शाळेला 7 वाजून 5 मिनिटांनी भेट दिली. यावेळी शाळेवर नियुक्तीला असलेले पाचपैकी 2 शिक्षक गैरहजर होते. तर एक शिक्षिका उशिरा आल्या. त्यामुळे लांगारे यांना आढळलेल्या त्रुटी आणि गैरहजर तसेच उशिरा येणार्या शिक्षकांवर थेट कारवाई करण्याचे आदेश त्यांनी नगरच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत.
अशीच तपासणी सकाळी सातपासून जिल्हाभर राबविण्यात आली. जिल्ह्यात गटशिक्षणाधिकारी आणि त्यांच्या पथकाने 462 शाळांना भेटी दिल्या. यात त्यांना चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव आले. अनेक ठिकाणी शाळांची वेळ सकाळची असताना विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. तसेच अनेक शाळांचा परिसर अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले आहेत. संबंधित ठिकाणी शिक्षकांना सूचना देण्यात आल्या असून बिगर परवानगी गैरहजर शिक्षकांवर कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. तालुकानिहा तपासणी झालेल्या शाळा अशा ः अकोले 82, जामखेड 13, कर्जत 14, कोपरगाव 19, नगर 9, नेवासा 29, पारनेर 23, पाथर्डी 45, राहाता 22, राहुरी 16, संगमनेर 32, शेवगाव 84, श्रीगोंदा 64 आणि श्रीरामपूर 10 यांचा समावेश आहे.

महिला शिक्षिका अस्वस्थ
जिल्ह्यातील शाळांची वेळ ही सकाळी करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली. प्रशासनाने देखील शाळांची वेळ सकाळची केली. मात्र, सकाळी शाळा करत असताना त्यात वेळेची मेख मारण्यात आली असून सकाळी सात वाजता शाळा भरवण्यात येत आहे. यामुळे लांब अंतराहून येणार्‍या महिला शिक्षिकांना घरातील सर्व कामे उरकून सकाळी सातपूर्वी शाळेत हजर राहावे लागत आहे. यामुळे महिला शिक्षिका अस्वस्थ झाल्या आहेत. शिक्षक संघटनेच्या मागणीवरूनच सकाळी शाळा झाल्याने त्यांना संतापही व्यक्त करणे अडचणीचे झाले आहे.

स्वच्छता व परिपाठ भावला
प्रशासक लांगोरे व शिक्षणाधिकारी पाटील यांनी सोमवारी सकाळी नेप्ती गावातील दोन शाळा पाहिल्यावर याच परिसरातील रानमळा शाळेला त्यांनी भेट दिली. या शाळेतील स्वच्छता, नियोजनबध्द परिपाठ पाहून लांगारे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची त्यांनी अचूक उत्तरे दिल्याने त्यांचे कौतुकही त्यांनी केले.

COMMENTS