Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्

अयोध्यातील महतांनी दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या येण्याचे आमंत्रण 
सावरकरांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान ः मुख्यमंत्री शिंदे
शेतकर्‍यांच्या मदतीचा निर्णय लवकरच

मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत शुक्रवारी झालेल्या मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी ज्या ठिकाणी धोका आहे अशा दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
इर्शाळवाडीवरील प्रसंग दुर्दैवी होता. आपल्याकडे सर्व यंत्रणा असताना आपण वापरू शकलो नाही ही मनामध्ये खंत आहे. शुक्रवारी पुन्हा बचावकार्य सुरू आहे. पहिल्या, दुसर्‍या दिवशीही माणसे जिवंत निघाल्याची अनेक उदाहरणे इतर दुर्घटनेत आपण पाहिली आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. म्हणजेच, ढिगार्‍याखाली अडकलेली माणसे सुखरूप असतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले, एनडीआरएफ टीमचं काम वाखणण्याजोगं आहे. जीव ओतून, जीव धोक्यात घालून त्यांना काम करताना पाहिलेलं आहे. ज्या ज्या लोकांना याविषयी माहिती मिळाली ते सर्व तिथे उपस्थित होते. दुर्घटनाग्रस्त लोकांची व्यवस्था आपण तातडीने केली आहे. 30 कंटेनर आले आहेत. यामध्ये 47 कुटुंबाची व्यवस्था करण्यात आली आहे. टॉयलेट, बाथरूमची सोय केली आहे.
दरम्यान, आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी प्रशासन आणि खासगी यंत्रणांमार्फत युध्दपातळीवर बचावकार्य सुरु आहे. एनडीआरएफ च्या 4 तुकड्या एकूण 100 जवान , टीडीआरएफ चे 80 जवान, इमॅजीका कंपनीचे 82 कामगार तर सिडकोचे 460 कामगार बाचाव कार्यात सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर चौक, वरोसे, खोपोली येथील ग्रामस्थ, वेगवेगळ्या एनजीओ, ट्रेकर ग्रूप मधून एकूण 900 पेक्षा अधिक लोक बचावकार्यात सहभागी झाले आहेत. रात्रीच्यावेळी बचावकार्य चालू ठेवण्यासाठी फ्लूड लाईट्स लावण्यात आले आहेत. 5000 फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले आहे. या दूर्घटनेत वाचलेल्या लोकांच्या निवार्‍यासाठी 60 कंटेनर मागविण्यात आले असून त्यापैकी 30 ते 40 कंटेनर आज घटनास्थळी पोहचले आहेत. त्यांच्या राहण्याची तात्पूरती व्यवस्था या कंटेनर मध्ये करण्यात आली आहे. तसेच 20 तात्पूरती शौचालये आणि 20 तात्पूरती स्नानगृहे तयार करण्यात आली आहेत. वेगवेगळया माध्यमांतून बचावकार्यासाठी लागणार्‍या आधुनिक यंत्रसामग्री मागविण्यात आल्या आहेत. मात्र घटनास्थ्ळ डोंगर माथ्यावर असल्याने या यंत्रसामग्री घटनास्थळापर्यंत नेण्यास अडचणी येत आहेत. आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर हे स्वत: संपूर्ण बचावकार्यावर लक्ष देत आहेत.

सिडकोकडून होणार पुनर्वसन – कायमस्वरुपी पुर्नवसन होत नाही तोवर त्यांच्या तात्पुरत्या निवारण्याची सोय करण्यात आली आहे. कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी जिल्हाधिकार्‍यांशी बोललो आहे. तातडीने पुनर्वसन झालं पाहिजे. पुनर्वसनासाठी सिडकोला आदेश देण्यात आले आहेत. त्यांना जागा दिल्या दिल्या त्यांनी कायमस्वरुपी घरे बांधून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली

COMMENTS