लोकप्रतिनिधींनी भाजपाच्या आयारामांना सोडून नगरपंचायत निवडणूक लढवून दाखवावी  : माजी मंत्री प्रा. राम शिंदे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकप्रतिनिधींनी भाजपाच्या आयारामांना सोडून नगरपंचायत निवडणूक लढवून दाखवावी : माजी मंत्री प्रा. राम शिंदे

कर्जत/प्रतिनिधी : कर्जत शहरातील सर्व सामान्य नागरिकांची इच्छा आहे की जर लोकप्रतिनिधींची खरोखर नैतिकता जिवंत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या आयारामांना

वीजमीटरचे १०० टक्के अचूक रीडिंग घ्या; अन्यथा कठोर कारवाई अटळ
वीज कोसळून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू l पहा LokNews24
थोरात कारखान्याकडून हुमणी अळी नियंत्रण अभियान

कर्जत/प्रतिनिधी : कर्जत शहरातील सर्व सामान्य नागरिकांची इच्छा आहे की जर लोकप्रतिनिधींची खरोखर नैतिकता जिवंत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या आयारामांना सोडून कर्जत नगरपंचायतची निवडणूक लढवून दाखवावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासाच्या मुद्द्यावर किती नगरसेवक निवडून येतात हे दाखवून देणे जनतेला अपेक्षित आहे. मात्र विकासाला फाटा देत कुटील, कपटी, खुनशी, दहशतीच्या राजकारणातून सामान्य जनतेला भिती दाखवण्यात लोकप्रतिनिधी धन्यता मानताना दिसत आहेत, हे कर्जतकरांचे दुर्दैव आहे. कर्जत शहरातील सुज्ञ नागरिक जनता आता भूलथापांना चांगल्या प्रकारे ओळखून चुकली आहे, अशी माहिती माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत येथे पत्रकार परिषद घेऊन दिली. 
पत्रकार परिषदेसाठी भाजपाचे प्रभारी निरीक्षक बाळासाहेब महाडिक, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, सचिन पोटरे, वैभव शहा, पप्पूशेठ धोदाड, गणेश पालवे आदी उपस्थित होते. प्रा. राम शिंदे पुढे म्हणाले, विकासाला साथ देत जनता ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर हाती घेणार आहे असे एकूण चित्र दिसत आहे. तर दहशत, दबाव, खुनशी राजकारणाला जनता आता खपवून घेणार नाही. आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी तत्पर राहील असा विश्वास आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कर्जत शहराच्या विकासासाठी राज्याच्या तिजोरीतून १५१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या वेगवेगळ्या विकास कामाच्या माध्यमातून कर्जत शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मनापासून प्रामाणिक प्रयत्न केला. याउलट गेल्या दोन वर्षांत विद्यमान लोकप्रतिनिधींनी विधानसभा निवडणुकीत केलेली आश्‍वासनांची खैरात आणि दाखवलेल्या खोट्या स्वप्नामुळे जनतेत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
गेल्या दोन वर्षांत त्यांना कर्जत शहरासाठी कुठलेही भरीव काम करता आले नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून ते रडीचा डाव खेळत आहेत, हे कर्जतच्या जनतेला कळले आहे. राजकीय इर्षेला पेटुन सुडाच्या, कुटील दबावाच्या, राजकारणातून त्रासदायक चित्र निर्माण केले, हे सर्व जनतेने पाहिले आहे. एवढे होऊनही विजयाची खात्री नसल्याने व पराभव समोर दिसत असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून वार्डनुसार मतदार याद्यामध्ये छेडछाड करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचना व नियम धाब्यावर बसवले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेल्या आक्षेपांकडे डोळे झाक करत, लोकशाहीला काळीमा फासण्याचे कृत्य केले आहेत. कुठल्याही प्रकारचा आक्षेप नसताना भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक पदासाठी इच्छुकांची नावे अंतिम मतदार यादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आली आहेत.  त्याचबरोबर पक्ष विचाराला मानणाऱ्या अनेक मतदारांना इतरत्र प्रभागात स्थलांतरित करण्यात आले आहे.  दबावाच्या राजकारणाला खतपाणी घालण्यासाठी शहराच्या शेजारील खेडे गावांमधील लोकांचा शहरातील प्रभागात समावेश करण्यात आला आहे. एकूण घटनाक्रम पाहता सामान्य मतदाराचा मतदानाचा हक्क हिरावण्याचे कारस्थान केले जाते आहे. या विरोधात भारतीय जनता पार्टी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार आहे असे प्रा. शिंदे म्हणाले.

COMMENTS