Homeताज्या बातम्यादेश

एचएएलच्या नावाने लोकांना भडकवण्यात आले ः पंतप्रधान मोदी

बेंगळुरू : सरकारवर खोटे आरोप करण्यासाठी एचएएलच्या नावाने लोकांना भडकवण्यात आले होते. त्यामुळे संसदेच्या कामकाजाचे अनेक तास वाया गेले परंतु, सत्य

जेऊर कुंभारी स्मशानभूमीस 80 हजार रुपयांची शवदानी
रामशिंग बाबांचा जंगी यात्रा उत्सवाचे उद्या आयोजन
धोंडीपुरा शाळेची जुनी इमारत पाडण्यास सुरुवात

बेंगळुरू : सरकारवर खोटे आरोप करण्यासाठी एचएएलच्या नावाने लोकांना भडकवण्यात आले होते. त्यामुळे संसदेच्या कामकाजाचे अनेक तास वाया गेले परंतु, सत्य कधीही लपून राहत नाही एक दिवस पुढे येतेच अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. कर्नाटकातील तुमाकुरू येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) हेलिकॉप्टर कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते.

या कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, आज तुमकुरूला देशातील खूप मोठा हेलिकॉप्टर कारखाना मिळाला आहे. तुमाकुरु इंडस्ट्रियल टाऊनशिपचीही पायाभरणी झाली आहे. सरकारवर खोटे आरोप लावण्यासाठी याच एचएएलचा वापर केला गेला होता. याच एचएएल नावाने लोकांना भडकवण्याचे कारस्थान रचले गेले होते. यात संसदेच्या कामकाजाचे अनेक तास वाया गेले. पण कितीही खोठे आरोप केले तरी एक दिवस सत्य समोर आल्याशिवाय राहत नाही. एचएएलचा हेलिकॉप्टर कारखाना आणि त्याची वाढती शक्ती खोटे आरोप करणार्‍यांचा पर्दाफाश करेल’, अशी टीका पंतप्रधानांनी केली. राहुल गांधींनी 2018 मध्ये बंगळुरुमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) च्या कर्मचार्‍यांसोबत बैठक घेतली होती. यानंतर त्यांनी सरकारवर एचएएलचा अपमान केल्याचा आरोप केला होता.’कर्नाटक ही संतांची भूमी आहे. संतांच्या आशीर्वादाने आज शेकडो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी, कर्नाटकातील तरुणांना रोजगार, ग्रामस्थ आणि महिलांना सुविधा उपलब्ध करून देणे, देशाचे सैन्य बळकट करणे आणि मेड इन इंडिया या प्रकल्पांचे उद्घाटन झाले. डबल इंजिन सरकारने कर्नाटकला गुंतवणूकदारांची पहिली पसंती दिली आहे. राष्ट्र प्रथम या भावनेने काम केले की यश मिळते. आपल्या संरक्षण गरजांसाठी आपल्याला परदेशावरील आपले अवलंबित्व कमी करावे लागेल असे पंतप्रधानांनी सांगितले. आजघडीला अशी शेकडो शस्त्रे आणि संरक्षण उपकरणे आहेत, जी फक्त भारतातच बनवली जात आहेत. याचा वापर आपले सैन्य करत आहेत. कर्नाटक ही तरुण प्रतिभा, तरुण नवनिर्मितीची भूमी आहे. ड्रोन निर्मितीपासून तेजस लढाऊ विमाने बनवण्यापर्यंत, कर्नाटकच्या उत्पादन क्षेत्राची ताकद जग पाहत आहे. गेल्या 8 वर्षांत आम्ही खाजगी क्षेत्रासाठीही दरवाजे उघडले आहेत. आज आधुनिक अ‍ॅसॉल्ट रायफल्सपासून रणगाडे, नौदलासाठी विमानवाहू युद्धनौका, हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने, वाहतूक विमाने भारत स्वत: तयार करत आहे. आगामी काळात तुमकुरूमध्ये शेकडो हेलिकॉप्टर तयार होणार असून त्यामुळे सुमारे 4 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

COMMENTS