शिवसेनेतील फुटीला पवारच जबाबदार : केसरकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेतील फुटीला पवारच जबाबदार : केसरकर

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात सत्तांतर झाले असून, शिवसेनेतील शिंदे गट सत्तेत सहभागी झाला असला तरी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अजूनही संपण्याची चिन्हे नाही

शिवसेनेनं बेईमानी करत मुख्यमंत्रिपदाची भूमिका सांगितली आणि भाजपशी युती तोडली
शिवसेनेचे गोंधळलेले राजकारण
अहमदनगरमध्ये शिवसेना- राष्ट्रवादीची पुन्हा दिसून आली एकी….

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात सत्तांतर झाले असून, शिवसेनेतील शिंदे गट सत्तेत सहभागी झाला असला तरी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अजूनही संपण्याची चिन्हे नाहीत. शिवसेना जेव्हा-जेव्हा फुटली, त्याला फक्त शरद पवारच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे.
यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केसरकरांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. 2014 मध्ये भाजपचे सरकार आले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, मात्र तेव्हा शिवसेनेला साधे शपथविधीचे निमंत्रण देखील देण्यात आले नव्हते. दुर्दैवाने आज त्याच शिवसेनेतील बंडखोर आमदार भाजपासमोर लोटांगण घालत आहेत, अशी टीका महेश तपासे यांनी केली. महेश तपासे म्हणाले, बेकायदेशीर शिंदे-फडणवीस सरकारचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिल्लीमध्ये जाऊन एक आरोप केला की, जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली ती शरद पवार यांच्यामुळे फुटली. दीपक केसरकर यांचं हे वक्तव्य अतीशय बेजबाबदार आहे. त्यांना शिवसेनेचा नीट इतिहास माहिती नसावा. त्या त्या काळात जे लोक शिवसेनेबाहेर पडले त्याची कारणे काय होती हे केसरकरांना माहिती नसावे, असा टोला महेश तपासे यांनी बंडखोर शिंदे गटाला लगावला.

COMMENTS