घनसावंगी : शिवसेना दलित आघाडीच्यावतीने जिल्हाअधिकारी कार्यलयावर आक्रोश मोर्चा | LOK News24

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घनसावंगी : शिवसेना दलित आघाडीच्यावतीने जिल्हाअधिकारी कार्यलयावर आक्रोश मोर्चा | LOK News24

जालना जिल्हाअधिकारी कार्यलयावर सोमवारी शिवसेना दलित आघाडीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. जालना जिल्हातील भूमिहीन गायरान जमीनी कास्तकरांच्या नावे

शिवसेनेतील फुटीला पवारच जबाबदार : केसरकर
महाराष्ट्राबाहेर शिवसेनेच्या सभेला तुफान प्रतिसाद… राऊत म्हणाले, खासदार शिवसेनेचाच होणार…
माथाडी कामगारांसाठी विविध उपक्रम राबवावेत – संभाजी कदम

जालना जिल्हाअधिकारी कार्यलयावर सोमवारी शिवसेना दलित आघाडीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. जालना जिल्हातील भूमिहीन गायरान जमीनी कास्तकरांच्या नावे करा. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन पाथरवाला तालुका अंबड येथील शासकीय शेतजमीन स्थानिक दलितांना दोन एकर जमीन पट्टे शेतीसाठी वाटप करून दलितांची आर्थिक उन्नती करावी.ऊस संशोधन केंद्र एजन्सी समर्थ सहकारी साखर कारखाना मालकीच्या 403 एकर जमिनीपैकी 303 एकर पडीक जमिनी मध्ये स्थापन करण्यात यावा .घरकुल योजनेतून रमाई आवास,शबरी घरकुल आवास,प्रधानमंत्री आवास योजनेतून उपेक्षित समाजातील वंचितांना निवारा देण्यात यावा. तसेच महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसाच्या ग्रामीण महाआवास मधून जागेअभावी अपूर्ण घरकुल प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यात यावेत. अश्या अनेक मागण्या जिल्हाअधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांनकडे  यावेळी करण्यात आल्या. यावेळी असंख्य नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.

COMMENTS