Sangamner : बोगस शिधापत्रिका प्रकरण शिवसेनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्याला भोवणार?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner : बोगस शिधापत्रिका प्रकरण शिवसेनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्याला भोवणार?

गुन्हा दाखल न झाल्यास ठिय्या आंदोलन करणार  भाजपाचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांचा इशारा बेकायदेशीर रित्या दारिद्र्यरेषेखालील शिधापत्र

Sangamner : संगमनेर ‘सिंघमला’ अखेर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिला न्याय (Video)
संगमनेर औद्योगिक वसाहतीत सततच्या चोरीची घटना
Sangamner : धांदरफळ खुर्द मध्ये बिबट्याचे दर्शन (Video)

गुन्हा दाखल न झाल्यास ठिय्या आंदोलन करणार 

भाजपाचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांचा इशारा

बेकायदेशीर रित्या दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकेचा वापर करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात तहसीलदार अमोल निकम यांनी गुन्हा दाखल न केल्यास तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा संगमनेर भाजपाचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी दिला आहे.

संगमनेर शहरातील शिवसेनेच्या एका विद्यमान पदाधिकाऱ्याने बेकायदेशीररित्या पिवळे रेशनकार्ड काढले आहे. त्याने दारिद्र्यरेषेखाली असल्याचे भासवून या शिधापत्रिकेचा लाभ घेतला आहे.भाजपाचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी या पदाधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार अर्ज केला आहे. ही बाब अतिशय गंभीर असून तहसीलदार अमोल निकम यांनी या प्रकरणात लक्ष घालून या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा. . याबाबत तहसीलदार अमोल निकम यांनी बुधवार दिनांक 12 ऑक्टोबर पर्यंत कारवाई न केल्यास गुरुवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी स्वतः या शिवसेना  पदाधिकाऱ्याच्या विरोधात फिर्याद देणार असल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS