Homeताज्या बातम्याविदेश

पाकिस्तान भूकंपाच्या धक्क्यांने हादरले

इस्लामाबाद ः पाकिस्तानमधील इस्लामाबाद भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये रविवारी दुपारी 1:24 वाजण्याच्या सुमारास भूकं

‘भगवद्गीता’ एक कालातीत मार्गदर्शक ग्रंथ : राज्यपाल राधाकृष्णन
12 राज्यांत 70 हून अधिक घरफोड्या करणारा जेरबंद
सत्ता संघर्षाचा निकाल या आठवड्यात येणार ?

इस्लामाबाद ः पाकिस्तानमधील इस्लामाबाद भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये रविवारी दुपारी 1:24 वाजण्याच्या सुमारास भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी मोजली गेली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची पुष्टी केली आहे. या भूकंपात अद्याप किती नुकसान झाले आहे, याची माहिती समोर आलेली नाही. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये 6.1 तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले होते.

COMMENTS