राष्ट्रवादीतर्फे रविवारी तिरंगा रॅलीचे आयोजन- ढाकणे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीतर्फे रविवारी तिरंगा रॅलीचे आयोजन- ढाकणे

पाथर्डी /प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रविवारी दिनांक १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी चा

धक्कादायक… एकाच कुटुंबातील तिघांनी केली आत्महत्या… कारण…
रत्नदीपच्या अध्यक्षांविरोधात विद्यार्थी, पक्ष संघटनांचा मोर्चा
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

पाथर्डी /प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रविवारी दिनांक १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता संस्कार भवन इथून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीत पथनात्याद्वारे स्वतंत्र चळवळींना उजाळा देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अँड प्रतापराव ढाकणे यांनी दिली.

स्वातंत्र्यदिनाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिनांक १४ ऑगस्ट रोजी संस्कार भवन इथून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून समारोप नाईक चौकात होणार आहे.

या रॅलीत पक्षाचे तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार असून पक्षाद्वारे स्वातंत्र्यचळवळीत घटनांना उजाळा देण्यात येऊन नव्या पिढीसमोर त्या काळातील प्रत्येक क्रांतिकारी नेत्यांचा इतिहास मांडला जाणार आहे या तिरंगा रॅलीत शहर व तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत स्वातंत्र्यचळवळीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्याप्रति अभिवादन करावे अवाहन अँड ढाकणे शिवशंकर राजळे डॉक्टर दीपक देशमुख यांनी केले.

COMMENTS