Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये 3 ते 4 सप्टेंबरला इंदिरा महोत्सवाचे आयोजन

डॉ. जयश्रीताई थोरात यांची माहिती

संगमनेरः  काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी मिळ

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणारा जेरबंद
तीन भावंडासह आईचा मृतदेह विहीरीत आढळला ; संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावातील घटना
कर्जतमध्ये टेम्पो अंगावर घालून जावयाचा खून

संगमनेरः  काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी मिळावी याचबरोबर त्यांना व्यवसाय उद्योजकतेचे मार्गदर्शन व्हावे याकरता थोरात कारखाना कार्यस्थळावर तीन व चार सप्टेंबर 2024 रोजी भव्य इंदिरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.
या इंदिरा महोत्सवाबाबत अधिक माहिती देताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासातून वैभवाकडे वाटचाल करत आहे. याचबरोबर संगमनेर तालुक्यातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी तसेच त्यांचा थेट उद्योजकांशी संवाद व्हावा या उद्देशाने दोन दिवसीय इंदिरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात रोजगार, प्रशिक्षण ,आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास यामधून महिलांना व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार 3 सप्टेंबर 2024 रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात ,मा. आमदार डॉ सुधीर तांबे यांसह संगमनेरातील सर्व मान्यवर व राज्य पातळीवरील महिला नेत्या आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री यांच्या उपस्थितीत होणार आहे. या महोत्सवामध्ये कापसे पैठणी, सह्याद्री ऍग्रो, प्रतीक्षा ट्रॅडिशनल बॅग, विजया ऍग्रो, टू ब्रदर्स गोदावरी फार्म , महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,बारामती बायोगॅस, सेजल ग्रुप, मिल्क फूड इंजिनिअरिंग ,सेल्को फाउंडेशन आदींसह राज्यभरातील नामांकित कंपन्या सहभागी होत आहेत. याच बरोबर कापसे पैठणी तर्फे भाग्यवान महिलांना पैठण्या भेट दिल्या जाणार आहेत.

इंदिरा महोत्सवाची जय्यत तयारी – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारती समोर अमृतेश्‍वर मंदिरासमोरील प्रांगणात इंदिरा महोत्सवासाठी भव्य वीस हजार स्क्वेअर फुटाचा जर्मन पद्धतीचा हँगर मंडप उभारण्यात आला आहे .एलईडी स्क्रीन, डोम, बैठक व्यवस्था ,भव्य स्टेज, पार्किंग, साऊंड सिस्टिम ,लाईट यांसह 100 बचत गटांचे स्टॉल, महिलांना चर्चा सत्रासाठी वेगवेगळे विभाग, मार्गदर्शन कक्ष, आरोग्य तपासणी कक्ष अशी जय्यत तयारी सुरू आहे

COMMENTS