Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

श्रीगोंदे न्यायालयाचा निकाल

अहमदनगर/प्रतिनिधी ः बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी छबू उर्फ छबन पांडुरंग आखाडे (रा. चिंचोली काळदात, ता. कर्

महिला सबलीकरण हा नव्या युगाचा जयघोष ः प्राचार्या डॉ. सुनीता गायकवाड
संगमनेमध्ये राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन
ओळख पत्र असल्याशिवाय भाजीपाला मार्केट मध्ये प्रवेश दिला जाणार नाही – नामदेव ठोंबळ

अहमदनगर/प्रतिनिधी ः बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी छबू उर्फ छबन पांडुरंग आखाडे (रा. चिंचोली काळदात, ता. कर्जत, अहमदनगर) याला श्रीगोंदे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील दुसरा आरोपी सुंदर उर्फ सुंदरदास आखाडे याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

न्यायालयाने आरोपी छबु उर्फ छबन पांडुरंग आखाडे याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व एकूण 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्याला भा.दं.वि. 376 (2)(जे)(एन) अन्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 6 महिने साधी कारावासाची शिक्षा
तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 कलम 6 अन्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 6 महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी क्र. 2 सुंदर उर्फ सुंदरदास आखाडे याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. संगीता अनिल ढगे यांनी पाहिले.

या घटनेची हकीगत की, चिंचोली काळदात (ता. कर्जत) येथे दि. 10 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास व 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास आरोपी छबु उर्फ छबन पांडुरंग आखाडे (रा. चिंचोली काळदात, ता. कर्जत, जि. अहमदनगर) याने अल्पवयीन बालिकेच्या घरात जावून व तिला मारुन टाकील अशी धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर पिडीत आणि पिडीतेच्या आई-वडीलांना ठार मारीन, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी क्रमांक दोन सुंदर उर्फ सुंदरदास आखाडे यास पिडीतेच्या आईने हा प्रकार सांगितला असता त्याने केस मागे घ्या, नाहीतर तुमच्याविरुध्द अनुसूचित जाती-जमाती कायद्याखाली केस दाखल करील, अशी धमकी दिली. त्यामुळे बालिकेच्या आईने आरोपींविरुध्द कर्जत पोलिस स्टेशन येथे लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 (पोस्को) व भा.दं.वि.कलम 376, 506 अन्वये गुन्हा नोंदविला.

या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींविरुध्द पोलिस उपनिरीक्षक अमरजीत मोरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश मुजीब एस. शेख यांच्या न्यायालयात झाली. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये बालिका, वैद्यकीय अधिकरी, तपासी अधिकारी, पोलिस ठाणे अंमलदार, पंच व चिंचोली काळदात प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. ढगे यांनी काम पाहिले. न्यायालयासमोर आलेला साक्षीपुरावा व सरकारी वकील अ‍ॅड. ढगे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी आशा खामकर तसेच पोलिस कॉन्स्टेबल गणेश काळाणे यांनी सहकार्य केले. 

COMMENTS