Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये भव्य योग शिबिराचे आयोजन

संगमनेर ः पतंजली योग समिती संगमनेर शाखेच्या वतीने संगमनेरकरां साठी भव्य युवा-संस्कार व योग-साधना शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती समितीचे अध्य

बेवारस 105 वाहन मालकांचा पोलिसांनी लावला शोध
राहुरी शहरात शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे : पालकमंत्री विखे
सोमैयाच्या अक्षय आव्हाडची ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड

संगमनेर ः पतंजली योग समिती संगमनेर शाखेच्या वतीने संगमनेरकरां साठी भव्य युवा-संस्कार व योग-साधना शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विनोद राऊत यांनी दिली. स्वामी रामदेव बाबा यांचे शिष्य व युवा भारतचे केंद्रीय प्रभारी स्वामी आदित्यदेवजी महाराज यांचे मार्गदर्शनाखाली सदर मोफत शिबिराचे आयोजन केले आहे.
शिबीर 21 मे ते 26 मे पासून सकाळी 5 ते साडे सात या वेळेत होणार आहे. शिबिराचे ठिकाण मालपाणी लॉन्स संगमनेर हे असून या शिबीरात उत्तम आरोग्यासाठी विविध योगासने, प्राणायाम, ध्यान धारण, सूर्य नमस्कार, चरित्र्य विकास व राष्ट्रनिर्माणसाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य याविषयी सुंदर मार्गदर्शन होणार असल्याची माहिती पतंजली योग समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. विजय देशमुख, प्रा. प्रकाश गोडगे, मंजुषा गोडगे, सुभाष कुटे यांनी दिली आहे. या शिबिराच्या माध्यमातून विविध आजार व त्याचे योगोपचार यावरही विशेष मार्गदर्शन होणार आहे. संगमनेर शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त योगसाधकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन दत्तात्रय चासकर, उत्तम देशमुख, रमेश बांगर, निवृत्ती शिर्के, हेमंत पाबळकर, दिलीप वराडे, प्रा. सतीश कडलग, अ‍ॅड. नानासाहेब दिघे, सुनील शिंदे, स्वप्निल कुटे यांनी केले आहे..

COMMENTS