Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसंतदादा पाटील महाविद्यालयात घेतली अवयवदान प्रतिज्ञा

पाटोदा प्रतिनिधी - येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 3 जुलै रोजी विद्यार्थी व कर्मचार्‍यांनी

वसंतदादा पाटील महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर वेबिनार संपन्न
वसंतदादा पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
वसंतदादा पाटील महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

पाटोदा प्रतिनिधी – येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 3 जुलै रोजी विद्यार्थी व कर्मचार्‍यांनी अवयवदानाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रोफेसर किशोर मचाले, डॉ. गणेश पाचकोरे, पदव्युत्तर विभाग संचालक डॉ. मनोजकुमार प्रकाश, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, डॉ. बबन मोहिते, रासेयो समन्वयक प्रोफेसर प्रशांत पाटील, प्रा. मनिषा गाढवे, डॉ. कुशाबा साळुंके उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याची प्रतिज्ञा घेतली व अवयवदान करण्यासाठी आवश्यक आवेदनपत्र भरून दाखल केली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे म्हणाले की अवयवदानाचा संकल्प करून आपण मरणोत्तर आपले अवयवदान करून दुसर्‍या व्यक्तीला एक नवीन जीवन देण्यात योगदान देऊ शकतो म्हणून प्रत्येक व्यक्तीने अवयवदानाचा संकल्प करून माणूसकी जपली पाहिजे.

COMMENTS