Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्टची मुदत 10 वर्षाची करावी

राहाता तालुक्यातील डॉक्टरांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

राहाता ः महाराष्ट्रात बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्टची मुदत 3 वर्षाऐवजी 10 वर्षाची करावी, अशी मागणी राहाता तालुक्यातील डॉक्टरांनी मुख्यमंत

सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी जनजागृती आवश्यक ः अ‍ॅड. शिंदे
आमच्या जीविताशी खेळू नका… शिक्षक परिषद व शिक्षक संघाची सरकारला आर्त विनवणी, आधी लसीकरण करण्याची मागणी
ज्येष्ठांनी नव्या पिढीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा – शिवाजीराव ससे

राहाता ः महाराष्ट्रात बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्टची मुदत 3 वर्षाऐवजी 10 वर्षाची करावी, अशी मागणी राहाता तालुक्यातील डॉक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राहाता तालुक्यातील डॉक्टर्स, वकील, व्यावसायिक, उद्योजक आदी नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. के. वाय. गाडेकर, यांच्यासह आदी डॉक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर संवाद साधला.
डॉ गाडेकर यांनी खासगी वैद्यकीय व्यवसायाचे बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट 1949 नूतनीकरण करताना या अ‍ॅक्टची मुदत फक्त 3 वर्षांची असते. त्यामुळे रजिस्ट्रेशन कार्यकाळ संपण्याची मुदत काही वर्षाची असल्याने पुन्हा नवीन नुतनीकरण करण्यासाठी कागदाची जुळवाजुळव करणे व रजिस्ट्रेशन मिळवणे याकरिता तीन ते चार महिन्यांचा कालावधी जातो. चंद्रपूर महानगरपालिकेने तेथील डॉक्टरांना वैद्यकीय व्यवसाय बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशनसाठी 10 वर्षांचा ना हरकत दाखला दिला आहे. तेथील पालकमंत्री यांच्या सूचनेमुळे त्या जिल्ह्यातील डॉक्टरांना 10 वर्षाचे बॉम्बे नर्सिंग होमचे रजिस्ट्रेशन मिळते. त्या पद्धतीचे 10 वर्षाचे रजिस्ट्रेशन नुतनीकरण महाराष्ट्रातील खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या डॉक्टरांना मिळावी तसेच सेवेज ट्रीटमेंट पोलुशन कंट्रोल फायर, इलेक्ट्रिक व स्ट्रक्चरल ऑडिटच्या अटी शिथिल करण्यात याव्या. ग्रामीण भागातील 15 बेडच्या हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य रुग्णांना महात्मा फुले जीवनदायी योजनेचा फायदा मिळावा याबाबत डॉक्टरांनी त्यांच्या वैद्यकीय व्यवसायात येणार्‍या अडचणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून निवेदन देण्यात आले आहे.

COMMENTS