Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू

पुणे : शहरात पावसाला सुरुवात झाल्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जुलैमध्ये संशयित रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली असून, त्यातील 12

कर्जत व पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ६० लाखांची रोकड केली हस्तगत
मुख्यमंत्र्यांच्या सभेहून परतताना शिवसैनिकाच्या गाडीने चिमुकलीला उडवले ! | LOK News 24
सत्ताधारी जातवर्गाला सत्तेचे अपचन!

पुणे : शहरात पावसाला सुरुवात झाल्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जुलैमध्ये संशयित रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली असून, त्यातील 12 जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. यंदा पहिल्यांदाच एका रुग्णाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची नोंद या महिन्यात झाली आहे. वर्षभरात आतापर्यंत डेंग्यूची रुग्संख्या 582 वर गेली आहे. यंदा जानेवारी ते जून या कालावधीत डेंग्यूचे 472 संशयित रुग्ण आढळले आणि त्यातील 21 जणांना डेंग्यूचे निदान झाले. डेंग्यूचे निदान झालेले सर्व रुग्ण जानेवारी ते मार्च या कालावधीत सापडले होते. एप्रिल ते जून या कालावधीत डेंग्यूचे निदान झालेला एकही रुग्ण सापडला नव्हता.

COMMENTS