Homeमनोरंजनलाईफस्टाईल

केस गळतीवर करा हे उपाय; नक्कीच फायदा होईल.

केसगळतीवर करा हे उपाय

केसगळतीवर करा हे उपाय केसांचा आपल्या सौंदर्यामध्ये खूप मोठा वाटा असतो केस गळती च्या समस्येसाठी घरगुती हेअर मास्क वापरणे . केस गळतीच्या समस्येवर ए

थलापती विजयने आई-वडिलांविरोधात दाखल केली तक्रार, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? (Video)
डॉ. अमोल कोल्हे यांना ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याच्या प्रयोगादरम्यान दुखापत
महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ

केसगळतीवर करा हे उपाय केसांचा आपल्या सौंदर्यामध्ये खूप मोठा वाटा असतो केस गळती च्या समस्येसाठी घरगुती हेअर मास्क वापरणे . केस गळतीच्या समस्येवर एवोकॅडो(Avocado) चा हेअर मास्क प्रभावशाली  केळी आणि एवोकॅडोचा केसांनी खूप फायदा 
केसगळतीवर आवळा,(Amla) शिकेकाई(Shikekai) आणि नारळाचे तेलाचा (Coconut oil) हेअर पॅक वापरणे नारळाचे तेल, शिकेकाई पावडर(Shikekai powder) आणि आवळा पावडर(Amla powder) यांचे मिश्रण वापरणे  
केसांच्या वाढीसाठी भृंगराज तेल(Bhrangraj oil) खूप फायदेशील
केसगळतीवर बिट, गाजर, सफरचंद यांचा ज्यूस फायदेशीर.  बहुतेक महिलांना लांब केस आवडतात . पण आजचे धकाधकीचे जीवन आणि वाईट जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होत आहे . त्यामुळे त्वचाच नाही तर केसही खराब होत आहेत . आपल्या केसांचा आपल्या सौंदर्यामध्ये खूप मोठा वाटा असतो . थोडेशे केस गळणे ही गोष्ट सामन्य आहे . पण जर सकाळी उठल्यावर तुमच्या उशीवर केसांचा झूपका आला तर मात्र ही गोष्ट खूपच भीतीदायक आहे. तुम्ही देखील जर या समस्येला सामोरे जात असाल तर हे ४ उपाय नक्की करून पाहा .

१. घरगुती हेअर पॅक

केस गळतीच्या समस्येवर एवोकॅडो(Avocado) चा हेअर मास्क प्रभावशाली ठरतो. यासाठी तुम्ही केळ्याचा ही वापर करु शकता. केळी(Bananas) आणि एवोकॅडोचा(Of avocado) केसांनी खूप फायदा होतो . एवोकॅडोमध्ये( Avocado) व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते, जे तुमचे केस दाट बनवण्याचे काम करते. त्यामुळे केसांच्या मुळांपासून केसांच्या टोकापर्यत हा  हेअर पॅकला लावा . केस गळतीसाठी हा हेअर पॅक उपयोगी ठरु शकतो.

२. आवळा, शिकेकाई आणि नारळाचे तेलाचा हेअर पॅक

केसांसाठी शिकेकाई(Shikekai) खूप चांगली मानली जाते. त्यामुळे केसांच्या वाढसाठी आवळा(Amla), शिकेकाई( Shikekai) आणि नारळाचे तेलाचा(Coconut oil) हेअर पॅक तुम्ही वापरु शकता. शिकेकाईमुळे केसांची मुळे मजबूत होतात त्यामुळे केस गळती कमी प्रमाणात होते. तर नारळाच्या तेलामुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. यासाठी तेल गरम करा त्यामध्ये शिकेकाई पावडर आणि आवळा पावडर टाका त्यानंतर या तेलाने केसांची मालिश करा. ३० मिनीटांनी केस धुवून टाका.

३. हे तेल ठरेल रामबाण उपाय

केसांना गरम तेलाने मसाज करणे ही आपली परंपरा आहे. केसांच्या वाढीसाठी भृंगराज तेल(Bhrangraj oil) खूप फायदेशील मानले जाते. या तेलाच्या मदतीने केसांची चांगली वाढ होते. त्याच प्रमाणे दुभंगलेले केस, कोंडा यांसारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते.

४. हा ज्यूस ठरेल फायदेशीर

घरातील गोष्टीपासून तुम्ही हा ज्यूस तयार करु शकता. यामध्ये बिट, गाजर , २ सफरचंद आणि आलेचे तुकडे हे सर्व साहित्य एकत्र करुन तुम्ही ज्यूस तयार करु शकता. हा ज्यूस तुम्ही आठवड्यातून दोन वेळा घेऊ शकता. या ज्यूसमुळे तुमचे केस वाढण्यास मदत होईल.

COMMENTS