Homeताज्या बातम्यादेश

हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे एकाचा मृत्यू

नवी दिल्ली ः गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील पावसाने थैमान घातले असून, सोमवारी सकाळी हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील कियास गावात ढगफुटी झाल

Ahmednagar : दुकान बंद करण्यास सांगणाऱ्या मुख्याधिकाऱ्याला धक्काबुक्की | LOKNews24
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोघांना गाडीने चिरडले .
करण कुंद्रा – तेजस्वी प्रकाशने गुपचूप उरकलं लग्न?

नवी दिल्ली ः गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील पावसाने थैमान घातले असून, सोमवारी सकाळी हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील कियास गावात ढगफुटी झाली. या ढगफुटीमुळे एकाचा मृत्यू झाला असून, 9 वाहने वाहून गेली असून, कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने कमी होत आहे. त्याचवेळी, उत्तराखंड आणि यूपीच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी आता धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचली आहे. रविवारी हरिद्वारमध्ये गंगेची पाण्याची पातळी 293.15 मीटर नोंदवण्यात आली, तर धोक्याचे चिन्ह 294 मीटर आहे. नदीलगतच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देवप्रयाग येथे गंगा नदी 20 मीटरने आणि ऋषिकेशला पोहोचेपर्यंत 10 सेमी वाढली. वाराणसी आणि प्रयागराजमध्ये घाट बुडू लागले आहेत. काही छोटी मंदिरे आधीच पाण्याने भरली आहेत. दुसरीकडे, सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत दिल्लीत यमुनेच्या पाण्याची पातळी 205.50 मीटरवर पोहोचली. गेल्या तीन तासात 205.45 च्या पातळीपर्यंत नोंद झाली.

COMMENTS