Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिरवाईने कातकरी वस्तीवर फुलवला दीपावलीचा आनंद

सातारा / प्रतिनिधी : सातार्‍यातील वाढेफाट चौकातील कातकरी वस्तीवर जावून प्रा. संध्या चौगुले यांनी मुलांना कपडे, दिवाळी फराळ वाटून त्यांच्या चेहर्‍

दुचाकी-चारचाकी कारची समोरासमोर धडक; एकजण जागीच ठार
सातारा जिल्हा बँकेकडून कर्जे स्वस्त केल्याची घोषणा
महाविकास आघाडी सरकार प्रत्येक गुन्ह्याचे समर्थन करते : आ. चंद्रकांत पाटील

सातारा / प्रतिनिधी : सातार्‍यातील वाढेफाट चौकातील कातकरी वस्तीवर जावून प्रा. संध्या चौगुले यांनी मुलांना कपडे, दिवाळी फराळ वाटून त्यांच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण केला. सदरबझार परिसरातील हिरवाई प्रकल्पात नुसती हिरवाईच फुलली नाही तर तिथे वाचन संस्कृती जोपासण्याबरोबरच आरोग्य शिबिरासह अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जातात. याच हिरवाई सामाजिक संस्थेतर्फे दीपावलीचा पहिला दिवस कातकरी वस्तीत जावून साजरा झाला. हिरवाईच्या संस्थापिका प्रा. संध्या चौगुले यांनी हिरवाई परिवाराच्या सहकार्याने जमा केलेल्या वस्तूंचे वाटप कातकरी वस्तीतील अबालवृध्दांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवला.
हिरवाई सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी कातकरी वस्तीतील महिलांसह मुलांना दीपावलीचे साहित्य वाटप केले जाते. यावर्षी देखील हिरवाई परिवारातील महिला, युवक, युवतींनी जमा केलेले साहित्य भल्या सकाळी कातकरी वस्तीवर जावून प्रा. चौगुले व कार्यकर्त्यांनी त्याचे वाटप केले. हा कार्यक्रम हिरवाईतच व्हायचा मात्र तो यावर्षी थेट कातकरी वस्तीवर जावून दीपावलीचा पहिला दिवस असा मदतीचा विवेकदीप लावून साजरा झाला.
कातकरी वस्तीतील मुलांना जवळ घेवून त्यांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवून दिवाळीतील अगदी गोडा-धोडाच्या खाण्यापासून नवे कपडे, फ्रॉक, शर्ट पँट, भाऊबीजेला बायकांसाठी नव्या साड्या, मुला-मुलींना रंगपेट्या कंपास, वह्या पुस्तके डोक्याला तेल, कंगवा, साबण, खेळणी वाटण्यात आली. डॉ. वैशाली चव्हाण यांनी आयएमए वुमन विंगच्या माध्यमातून कातकरी मुलींसाठी 40 नवीन फ्रॉक घेऊन दिले. प्राची कुलकर्णी यांनी साबण, खोबरेल तेल बॉटल आणि कंगवा असे 25 सेट दिले. पद्मा ठाकूरदेसाई यांचेकडून 50 मुलांसाठी दिवाळी स्वीट्स आणि महिलांना भाऊबीजेनिमित्त नवीन साड्या देण्यात आल्या. युनिव्हर्सल सिक्युरिटी सर्व्हिसेसकडून पन्नास मुलांसाठी दिवाळीचा फराळ आला.
हिरवाईतर्फे कातकरी वस्तीतील शाळेत जाणार्‍या सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हिरवाई व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून हिरवाईच्या मैत्रिणींनी संपूर्ण कातकरी वस्तीतील सर्व वयोगटाला वर्षभर पुरतील इतके सुस्थितीतील कपडे, स्वेटर्स, बेडशीट्स, खेळणी अशा वस्तू दिल्या.
कातकरी मुलांनी आणि हिरवाईचे कार्यकर्ते धनंजय चौगुले, सुमीत मतकर, वैभव लोटके यांनी संपूर्ण वस्तीभर पताका लावून रांगोळ्या काढून वस्तीची सजावट केली होती. यामुळे मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून खरी दिवाळी अनुभवायला मिळाली, अशी भावना प्रा. चौगुले यांनी व्यक्त केली.

COMMENTS