मुंबई प्रतिनिधी - काही दिवसांपूर्वी 50 पहिलवानांनी राजकारणातली कुस्ती जिंकली. त्याचे वस्ताद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. 40 पैलवान हे आखाड्य
मुंबई प्रतिनिधी – काही दिवसांपूर्वी 50 पहिलवानांनी राजकारणातली कुस्ती जिंकली. त्याचे वस्ताद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. 40 पैलवान हे आखाड्यातलेच होते, त्याबरोबर इतर आखाड्यातले दहा पैलवान घेऊन ही कुस्ती ही राजकीय कुस्ती जिंकली अशी प्रतिक्रिया आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे. राजकारणाच्या आखाड्यात विरोधकांना चितपट करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई चांदिवली परिसरात कुस्ती महोत्सवाचं आयोजन चांदिवली विधान सभेचे आमदार दिलीप लांडे यांनी केलं. यावेळी ते बोलत होते. या कुस्तीसाठी महाराष्ट्रभरातून अनेक कुस्तीपटू या आखाड्यामध्ये सामील झाले. अनेक नामांकित कुस्तीपटूंनी या कुस्तीच्या आखाड्यात आपला सहभाग नोंदविला आहे. महिलांची कुस्ती या कुस्तीच्या आखाड्यात प्रमुख आकर्षण ठरली. या निमित्ताने नामवंत आजी माजी कुस्तीपटुंचा सन्मान देखील करण्यात आला.
COMMENTS