Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अस्वलाच्या हल्ल्यात वृध्द गंभीर

पाटण / प्रतिनिधी : कोयना भागातील कोळणे गावातील अर्जुन मानू डांगरे (वय 80) यांच्यावर सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अस्वलाने हल्ला केला अ

प्रकाश संकुलाच्या कर्मचार्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम मंत्री जयंत पाटील करतात : अभिजित पाटील
सातारच्या जवाहर नवोदय विद्यालयात कोरोनाचा शिरकाव
उसदरासाठी स्वाभिमानीचे खटाव तालुक्यातून रणशिंग

पाटण / प्रतिनिधी : कोयना भागातील कोळणे गावातील अर्जुन मानू डांगरे (वय 80) यांच्यावर सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अस्वलाने हल्ला केला असून त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना कराड येथे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या हेळवाक वनपरिक्षेत्रातील कोळणे, ता. पाटण येथील अर्जुन मानू डांगरे (वय 80) हे सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कोळणे गावाच्या खाजगी क्षेत्रातील मोबाईल नेटवर्क असलेल्या ठिकाणी फोन करण्यासाठी गेले असता अचानक त्यांचेवर अस्वलाने हल्ला केला. ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ व वन्यजीव विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले त्याठिकाणी प्राथमिक उपचार केले नंतर त्यांना पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल कराड येथे हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल (वन्यजीव) हेळवाक संदीप जोपळे, वनपाल रमेश वालकोळी, वनरक्षक आकाश टेंबरे व वनकर्मचारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

COMMENTS