Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा समाजाचे ओबीसीकरण होवू देणार नाही

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांचा इशारा

नागपूर/प्रतिनिधी ः मराठा समाजाचे सरसकट ओबीसीकरण केले जाणार नाही याचे आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन सुरूच राहिल अशी

परीक्षा देण्यास आलेल्या विद्यार्थ्याला चोरट्यांनी लुटले अन्… | LOK News 24
एसटी संपत सामील झाल्याने वरिष्ठांकडून त्रास; एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न | LOK News 24
तुळसण येथे बिबट्या दुचाकीच्या आडवा : चालक जखमी

नागपूर/प्रतिनिधी ः मराठा समाजाचे सरसकट ओबीसीकरण केले जाणार नाही याचे आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन सुरूच राहिल अशी घोषणा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी येथे केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना काय आश्‍वासन दिले याची माहिती कोणालाही नाही, असेही तायवाडे यांनी म्हटले आहे. ते नागपुरात उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी बोलत होते.
राज्य सरकारने महसूलच्या नोंदी बघून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली आहे, याविरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शवत ओबीसी संघटनांकडून आमरण उपोषण करण्यात येत आहे.  जालना येथे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी नंतर मागे घेतलेले आहे. मात्र मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीने या मागणीचा विरोध करीत संविधान चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज साखळी उपोषणाच्या सहाव्या दिवशी माजी मंत्री श्रीकांत जिचकार ह्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. तसेच पोळ्यानिमित्त बैलजोडीची पूज्हाा करून उपोषणारा सुरूवात करण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, आमदार सुनील केदार, भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे, कृती समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे पाटील, शरद वानखेडे, गुणेश्‍वर आरिकर, घनश्याम मांगे, अवंतिका लेकुरवाळे, सुभाष घाटे, कल्पना मानकर आदी उपोषण करीत आहे. सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीच्या मागण्यांवर सरकारने त्वरित विचार करून त्या मान्य कराव्या या करीता ओबीसी विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. ओबीसी समाजात याबद्दल आधीच अस्वस्थता आहे. वंशावळ किंवा 1965 च्या पूर्वीच्या कागदपत्रांमध्ये मराठा म्हणून नोंद असल्यास मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यास हरकत नाही. मात्र सरसकट दिल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा नेत्यांनी दिला.

राज्यभर मोर्चा काढण्याचा इशारा – मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता व ओबीसी समाजाच्या आरक्षणातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी मागणी वक्त्यांनी केली. सरकारनी त्वरित उपरोक्त मागण्या पूर्ण न केल्यास 18 सप्टेबर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा ओबीसी संघटनांकडून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी ओबीसी तरूणांचे उपोषण सोडवावे ः वडेट्टीवार – मनोज जरांगे यांचे उपोषण सुटल्याचा आनंद आहे. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर फिरून ओबीसी तरुणांचे उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी केली. मनोज जरांगे यांचे उपोषण सुटले याचा आम्हाला आनंद आहे. आता सरकारवर आरक्षणाच्या आश्‍वासनाची पूर्तता करण्याची जबाबदारी आहे. या प्रकरणी ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, याची ग्वाही देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, जिथे ओबीसी तरुण उपोषणाला बसले आहेत, तिथंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जावे आणि उपोषण सोडवावे. जागोजागी जावून उपोषण सोडवणे आणि आंदोलन थांबवणे हेच काम सरकरच राहिले आहे.

COMMENTS